Headlines

Tatkal Passport: आता 3 दिवसात घरी येईल तुमचा पासपोर्ट, अर्ज कसा करायचा वाचा…

Tatkal Passport: आता 3 दिवसात घरी येईल तुमचा पासपोर्ट, अर्ज कसा करायचा वाचा…
Tatkal Passport: आता 3 दिवसात घरी येईल तुमचा पासपोर्ट, अर्ज कसा करायचा वाचा…


Tatkal Passport : जर तुम्हाला अचानक परदेश दौऱ्याची संधी आली आणि नेमका तुमच्याकडे पासपोर्ट नाही तर काही काळजी करण्याची गरज नाही. भारत सरकारची तात्काळ पासपोर्ट योजनेंतर्गत तुम्ही सामान्य प्रक्रियेपेक्षा जलदगतीने पासपोर्ट तयार करु शकता. अनेक प्रकरणात अर्ज आणि कागदपत्रे योग्य असली तर १ ते ३ कामकाजाच्या दिवसात पासपोर्ट जारी केला जातो. मात्र, पासपोर्ट तुमच्या कागदपत्रे आणि प्रक्रियेवर अवलंबून असतो.

तात्काळ पासपोर्ट योजना काय?

तात्काळ पासपोर्ट योजनेंतर्गत पासपोर्टसाठी अर्ज प्रक्रीयेला प्राधान्य क्रमाने प्रोसेस केले जाते. ही सुविधा त्या लोकांसाठी असते ज्यांना नोकरी, शिक्षण, मेडिकल इमर्जन्सी वा परदेश प्रवासासाठी लवकरात लवकर पासपोर्टची गरज असते.

तात्काळ पासपोर्ट बनवण्यासाठी गरजेची कागदपत्रे

आधार कार्ड

पॅन कार्ड

व्होटर आयडी वा ड्रायव्हिंग लायसन्स

वीज बिल

बँक पासबुक

जन्म तारखेचा दाखला

अलिकडील पासपोर्ट साईज फोटो

तात्काळ पासपोर्टची फीस किती?

36 पानांचा नवा पासपोर्ट- ₹3,500

60 पानांचा नवा पासपोर्ट – ₹4,000

तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज कसा करणार ?

1. पासपोर्ट सेवा पोर्टलवर जा..

2. तुमचे अकाऊंट बनवून लॉग इन करावे.

3. अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट ऑप्शन निवडावे

4. अर्ज भरावा आणि तात्काळ पर्यायाची निवड करावी

5. आवश्यक डॉक्यूमेंट अपलोड करावे

6. ऑनलाइन फीस जमा करावे

7. नजिकच्या पासपोर्ट सेवा केंद्रात अपॉईंटमेंट बुक करावी

8. ठरलेल्या तारखेला कागदपत्रांसोबत पोहचून बायोमेट्रिकची प्रोसेस पूर्ण करावी

किती दिवसात मिळेल पासपोर्ट?

जर सर्व कागदपत्रे योग्य असतील आणि अर्जात काही त्रूटी नसतील तर तात्काळ पासपोर्ट सर्वसाधारणपणे 1 ते 3 दिवसात तयार होतो. काही प्रकरणात पासपोर्ट आधी जारी केला जातो आणि नंतर पोलीस व्हेरिफिकेशन केले जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *