
थलपती विजय आणि त्रिशा कृष्णनImage Credit source: Instagram
तमिळगा वेत्री कझगमचे (टीव्हीके) प्रमुख आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सी. जोसेफ विजय यांनी आज (रविवार) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांसह राहुल गांधीसुद्धा उपस्थित होते. तर अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या उपस्थितीने यावेळी सर्वांचं लक्ष वेधलं. निळ्या रंगाची साडी नेसून अत्यंत पारंपरिक पोशाखात त्रिशा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होती. कार्यक्रमस्थळी त्रिशा येताच सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या. गेल्या काही काळापासून थलपती विजय यांच्यासोबत त्रिशाचं नाव जोडलं जात आहे. त्यामुळे या शपथविधी सोहळ्यातील तिच्या उपस्थितीची विशेष चर्चा रंगली. त्रिशाने यावेळी विजय यांची आई आणि बहिणीचीही गळाभेट घेतली.
शपथविधी सोहळ्यापूर्वी विजय यांच्या आईने अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली. “आज मी फार खुश आहे. आज मदर्स डे निमित्त माझ्या मुलाने मुख्यमंत्री होऊन मला खूप मोठी भेट दिली आहे. ही फक्त माझ्यासाठी तर संपूर्ण तमिळनाडूच्या जनतेसाठी अभिमानाची गोष्ट आहे”, अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या.
VIDEO | Chennai: Actor Trisha Krishnan warmly greets TVK chief Vijay’s sister and mother as she arrives at Jawaharlal Nehru Indoor Stadium for his swearing-in as Tamil Nadu CM.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/tePCyk9uHa
— Press Trust of India (@PTI_News) May 10, 2026
अभिनेत्री सनम शेट्टीनेही आनंद व्यक्त केला आहे. “आज मी इथे आपल्या सर्वांचे प्रिय थलपती विजय यांच्यासाठी इथे उभी आहे. आज मदर्स डे असून तमिळनाडूचे सुपुत्र, आपल्या जनतेचे मुख्यमंत्री थलपती विजय हे पदभार स्वीकारत आहेत. विजय सरांचं नाव न ऐकलेली अशी कोणती व्यक्ती नाही. आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतोय की आमच्या विजय सरांच्या शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. इथपर्यंतचा त्यांचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. गेली दोन वर्षे अत्यंत कठीण होती”, अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.
विजय थलापति की माँ शोभा चंद्रशेखर का भावुक कर देने वाला बयान ,
” आज में बहुत खुश हूं , आज मुझे मातृ दिवस पर मेरे बेटे ने मुख्यमंत्री बनकर गिफ्ट दिया है , ये मेरे लिये नहीं बल्कि पूरे तमिलनाडु के लोगो के लिये गर्व की बात है ” ,pic.twitter.com/P17aN0rV8h
— Nargis Bano (@Nargis_Bano78) May 10, 2026
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याच्या आधीपासूनच त्रिशा आणि विजय यांचं नातं सतत चर्चेत आहे. विजय यांची पत्नी संगीता सोरनलिंगमने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करत त्यात विजय यांच्यावर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्रिशा आणि विजय यांच्या नातेसंबंधाच्या अधिक चर्चा होऊ लागल्या आहेत. तमिळनाडूमधील निवडणुका, त्यानंतर निकाल आणि आता शपथविधी सोहळा.. या संपूर्ण प्रवासात त्रिशा सतत विजय यांच्या पाठिशी असल्याचं दिसून आलं. निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सकाळी तिने तिरुपती बालाजी यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर संध्याकाळी ती विजय यांच्या निवासस्थानी पोहोचली होती.