Headlines

Yavatmal | गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण

Yavatmal | गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण
Yavatmal | गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण

यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार परिसरात गुप्तधनाच्या शोधासाठी अघोरी पूजा करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगाव जंगल पोलिसांनी मध्यरात्री कारेगाव शेतशिवारात ही कारवाई केली.

वरूड-कारेगाव रस्त्यावर संशयितांची चारचाकी वाहन तपासताना पोलिसांना अघोरी पूजेसाठी लागणारे साहित्य सापडले. यात कुदळ, अगरबत्ती, ज्वारीचे पीठ, काळ्या बाहुल्या, त्रिशूळ, रुद्राक्ष माळ, केस, लिंबू, सुया आणि रंगीत धागे यांचा समावेश होता.

चौकशीत या सहा जणांनी आलैकिक गुप्तधन मिळवण्यासाठी येथे आल्याची कबुली दिली. ताब्यातील पाच जण वाशिम जिल्ह्यातील असून एक जण आर्णी येथील आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून अशा प्रकारांवर कारवाई अधिक कडक करण्याचा इशारा दिला आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *