Headlines

अभिषेक बॅनर्जी यांना अटक होईल अशी ममता बॅनर्जी यांना भिती, त्यामुळे घेतला हा निर्णय…

अभिषेक बॅनर्जी यांना अटक होईल अशी ममता बॅनर्जी यांना भिती, त्यामुळे घेतला हा निर्णय…
अभिषेक बॅनर्जी यांना अटक होईल अशी ममता बॅनर्जी यांना भिती, त्यामुळे घेतला हा निर्णय…


पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीनंतर तृणमुल काँग्रेसचे संकट सतत वाढत आहे. पक्षात ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात कार्यकर्ते आवाज उठवत आहेत. तृणमुल काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षात फूट पडली आहे आणि ऋतब्रत बॅनर्जीच्या नेतृत्वाखाली ५८ आमदारांनी वेगळा गट बनवला आहे आणि आता टीएमसीच्या खासदारांमध्ये फूट पडण्याचा धोका निर्माण झाला होता. असा दावा केला जात खासदार काकोली घोष दस्तीदार याच्या नेतृत्वाखाली तृणमुल काँग्रेसचे १८ खासदार लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊ शकतात.

यामुळे आता ममता बॅनर्जी यांनी पार्टी डॅमेज कंट्रोल सुरु केले आहे आणि शुक्रवारी पार्टीच्या कार्यकारिणीच्या विरोधात बैठक बोलावली आहे. या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी खासदार आणि आपले भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर विश्वास दाखवला आहे, मात्र त्यांचे पंख कापले आहेत.

ममता बॅनर्जी यांनी अभिषेक बॅनर्जी यांना राष्ट्रीय महासचिव पदी कायम ठेवले आहे. मात्र त्यांची ताकद कमी केली आहे. पार्टीचे दोन वरिष्ठ खासदार डेरेक , ब्रायन आणि डोला सेन यांना संयुक्त महासचिव बनवले आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की पक्षाच्या पराभवासाठी अभिषेक बॅनर्जी जबाबदार आहेत. ममता बॅनर्जी यांनी कदाचित दोन आणि आणखीन लोकांना जबाबदारी देऊन हे स्पष्ट केले आहे. काहींचे म्हणणे आहे की यामागे आणखी एक कारण आहे. ममता यांना अभिषेक बॅनर्जी यांच्या अटकेची कारवाई होण्याची भीती सतावत आहे.

अभिषेक यांच्या अटकेची भिती का ?

तृणमुल काँग्रेस अंतर्गत अशी अफवा पसरली आहे की अभिषेक बॅनर्जी वेगवेगळ्या प्रकरणांमुळे घेरले जात आहेत. त्यामुळे डायमंड हार्बर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अभिषेक बॅनर्जी यांना अटक होऊ शकते असे म्हटले जात आहे. बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर कोलकाता महानगर पालिकेने अभिषेक बॅनर्जी यांच्या घराच्या बांधकामाच्या वैधतेवर प्रश्न निर्माण होऊ त्यांना नोटीस बजावली आहे. मात्र, दोन्ही घरांपैकी कोणतेही घर थेट अभिषेक बॅनर्जी यांच्या नावावर नाही.

मात्र, सक्तवसुली संचालनालया ( ईडी ) च्या कारवाईची भिती वाढली आहे. अलिकडेच ईडीने रिक्रुटमेंट करप्शन केसमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर नोटीस दिली होती. त्यामुळे तेव्हा पासून ही भीती वाढत चालली आहे. विशेष म्हणजे कोयला स्मगलिंग केसमध्ये सामील झाल्या प्रकरणात त्यांना आधी देखील ईडीच्या ऑफसमध्ये हजर व्हावे लागले होते. त्यामुळे पक्षाने याच भीतीने डेरेक आणि डोला यांच्या खांद्यावर आधीच जबाबदारी दिल्याचे म्हटले जात आहे.

अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

पक्षातील नेते ममता बॅनर्जी यांना नेते मानण्यास तयार आहेत, परंतू अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण करत आहेत. काही जर तर स्पष्ट भाषेत म्हणत आहेत की अभिषेक बॅनर्जी यांच्यामुळे पक्ष संपला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी अभिषेक बॅनर्जी यांना पार्टीत पदावर कायम जरी ठेवले असले तरी पूर्वी सारखी त्यांना ताकद न देता त्यांचे पंख कापले आहेत.

 टीएमसीच्या डझनभर नेत्यांना अटक

प.बंगालमध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर टीएमसीच्या डझनभर नेत्यांना अटक झाली आहे. तृणमुल काँग्रेसच्या माजी आमदार आणि ताकदवान नेत्यांना अनेक प्रकरणात अटक झाली आहे. शुक्रवारी एनआयएने दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील भांगडचे हेव्हीवेट नेते शौकत मोल्ला यांना अटक केली आहे. याआधी माजी आमदार सुजित बोस सह अनेक बड्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *