
इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात पाकिस्तानने मध्यस्थी करण्याचा दिखावा केला. अमेरिकेच्या हाताला धरून त्यांनी आपल्या फायद्यासाठी या युद्धात काही गोष्टी केल्या.
डोनाल्ड ट्रम्प यांना आम्ही तुमच्या जवळचे आहोत असे वेळोवेळी पाकिस्तानकडून दाखवले जाते. पाकिस्तान भारताविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांचे कान भरतो. यादरम्यानच आता पाकिस्तानला आपले शाहनपण अंगलट येताना दिसतोय.
इराणचे सर्वाेच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या अखेरच्या निरोप समारंभात पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ सहभागी झाले. यादरम्यान थेट अयातुल्लाह अली खामेनेई यांना अखेरचा निरोप देताना शहबाज शरीफ यांना अश्रू अनावर झाले.
शहबाज शरीफ अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारत दिसल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचे खासदार चांगलेच भडकले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना देखील मोठा धक्का बसला.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी पाकिस्तान भीक मागताना दिसत आहे. टॅरिफ देखील अमेरिकेने पाकिस्तानवर लावला नाही. मात्र आता पाकिस्तानविरोधात अमेरिकेला मोठी भूमिका घेऊ शकतो. आम्ही सर्व बघत आहोत, असेही अमेरिकेने म्हटले.