Headlines

अमेरिकेने केला घात, इराण बैठकीत व्यस्त, जगात हाहाकार, थेट समुद्रातच..

अमेरिकेने केला घात, इराण बैठकीत व्यस्त, जगात हाहाकार, थेट समुद्रातच..
अमेरिकेने केला घात, इराण बैठकीत व्यस्त, जगात हाहाकार, थेट समुद्रातच..


इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानमध्ये पोहोचले आहे. इराण युद्धबंदीबाबत जी काही चर्चा आहे ती पाकिस्तानसोबत करणार आहे. अमेरिकेसोबत एकत्र येऊन एकाच टेबलवर चर्चा करण्यास इराणकडून नकार देण्यात आला. त्याचे कारण म्हणजे होर्मुज खाडीतील सध्याची परिस्थिती. इराणचे शिष्टमंडळ युद्धबंदीची चर्चा करण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेलेले असताना अमेरिकेने पुन्हा इराणची दुखती नस दाबली आहे. अमेरिकेने पुन्हा होर्मुज खाडीजवळ इराणचे जहाज रोखले आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने याबाबत सांगितले की, अमेरिकेच्या नौदलाच्या मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक जहाज यूएसएस राफेल DDG 115 याने 24 एप्रिल रोजी इराणचा ध्वज असलेल्या जहाजाला पकडले. हे जहाज इराणच्या बंदराकडे जात होते. ज्याला अमेरिकेने कारवाई करत थांबवले.

CETCOM ने एक्सवर पोस्ट शेअर करत लिहिले की, इराणविरोधात कारवाई सुरू आहे. अमेरिकेने एप्रिलच्या सुरुवातीपासून इराणच्या बंदरांवर नौदल नाकेबंदी लादली आहे. याचा उद्देश आहे की, इराणचा व्यापार आणि तेल निर्यात बंद करणे. यानुसार, आतापर्यंत अनेक जहाजांना रोखण्यात आले. त्यांना परत जाण्यासाठी मजबूर केले. अमेरिकेच्या या नाकेबंदीचा परिणाम थेटपणे होर्मुज खाडीत बघायला मिळत आहे.

हा जगातील सर्वात मोठा समुद्री मार्ग आहे. अमेरिकेच्या नाकेबंदीचा इराणकडून विरोध केला जात आहे. यादरम्यान अमेरिकेने कारवाई करत पुन्हा एकदा इराणच्या जहाजाला टार्गेट केले. सध्याच्या परिस्थितीमुळे तेलाच्या निर्यात आणि आयातीवर मोठा परिणाम झाला. होर्मुज खाडी अजूनही इराणच्या नियंत्रणात आहे. मात्र, इराणभोवती नाकेबंदी करून अमेरिकेने इराणला जैरीस आणले.

त्यामध्येच जे जहाज इराणच्या बंदरातून बाहेर पडत आहेत किंवा इराणच्या बंदराकडे जात आहेत, अशा जहाजांवर कारवाई अमेरिकेकडून केली जात आहे. इराणचे एक जहाजही अमेरिकेने जप्त केले आहे. कित्येक जहाजांना परत जाण्यास अमेरिकेने भाग पाडले. होर्मुज खाडी ठप्प आहे. इराणच्या अर्थव्यवस्थेवर थेटपणे परिणाम होत आहे. जगातील तेल पुरवठा विस्कळीत झाला. मात्र, युद्धविरामाची काही घोषणा होत नाही, उलट परिस्थिती अधिक चिघळताना दिसत आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *