Headlines

अरिजीत सिंहच्या या गाण्याला मिळाले 120 कोटी अधिक व्ह्यूज, पण ज्याच्यासाठी गायलं त्याचं 9 महिन्यात झाला निधन

अरिजीत सिंहच्या या गाण्याला मिळाले 120 कोटी अधिक व्ह्यूज, पण ज्याच्यासाठी गायलं त्याचं 9 महिन्यात झाला निधन
अरिजीत सिंहच्या या गाण्याला मिळाले 120 कोटी अधिक व्ह्यूज, पण ज्याच्यासाठी गायलं त्याचं 9 महिन्यात झाला निधन


Arijit Singh Most Viewed Song: भारतीय संगीतविश्वातील आघाडीचा गायक अरिजीत सिंह आज आपला 39वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सुरेल आवाजाने कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अरिजित सिंगने असंख्य सुपरहिट गाणी दिली आहेत. त्याच्या प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो.

करिअरच्या सुरुवातीपासून रोमँटिक, इमोशनल ते डान्स नंबर अशा विविध प्रकारच्या गाण्यांमध्ये अरिजित सिंहने आपली वेगळी छाप निर्माण केली. अलीकडेच त्याने प्लेबॅक सिंगिंगमधून काही प्रमाणात मागे हटण्याचा निर्णय घेत चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. मात्र, तो स्वतंत्र म्युझिकच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी जोडून राहणार आहे.

अरिजित सिंहच्या अनेक गाण्यांपैकी एक गाणं विशेष ठरलं आहे खैरियत. 2019 साली प्रदर्शित झालेल्या ‘छिछोरे’ या चित्रपटातील हे गाणं आजपर्यंत यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेल्या गाण्यांपैकी एक आहे. या गाण्याला तब्बल 120 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर 8.3 मिलियनहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. या गाण्याचं विशेष महत्त्व म्हणजे ते सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून संगीत ‘प्रीतम’ यांनी दिलं आहे.

ज्याच्यासाठी गायलं गाणं, त्याचं झालं निधन

‘खैरियत’ हे गाणं प्रेक्षकांसाठी भावनिकदृष्ट्या अधिक खास ठरतं, कारण या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अवघ्या 9 महिन्यांत म्हणजेच 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचे निधन झाले. त्यामुळे हे गाणं ऐकताना आजही चाहत्यांच्या मनात त्याच्या आठवणी ताज्या होतात. अरिजित सिंहच्या टॉप गाण्यांमध्ये ‘खैरियत’सह Phir Bhi Tumko Chaahunga, Tera Fitoor यांसारख्या गाण्यांचाही समावेश होतो. या सर्व गाण्यांनी यूट्यूबवर कोट्यवधी व्ह्यूज मिळवले आहेत.

दरम्यान, ‘छिछोरे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले होते तर निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली होती. सुमारे 50 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात सुमारे 211 कोटींची कमाई केली. विशेष म्हणजे, या चित्रपटाला ‘बेस्ट हिंदी फीचर फिल्म’चा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. आजही ‘खैरियत’ हे गाणं ऐकलं की प्रेक्षक भावुक होतात आणि अरिजित सिंहच्या आवाजाची जादू पुन्हा एकदा अनुभवतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *