
आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये अनेक अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या युगात वावरण्यासाठी फार गरजेच्या आहेत. यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, व्यक्तीचा चांगुलपणा… आचार्य चाणक्य म्हणतात, कोणी अती चांगलं असू नये. कारण याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. चाणक्य म्हणतात, समाजात एक चांगला माणूस म्हणून जगणं खूप महत्त्वाचं आहे. परंतु अतिरेकी चांगुलपणा म्हणजेच प्रामाणिकपणा कधीही चांगला नसतो. ज्याप्रमाणे अमृत जास्त झाल्यास विष बनतं, त्याचप्रमाणे अति चांगुलपणामुळे आपण अडचणीत येऊ शकतो. म्हणून, प्रत्येक चांगल्या गुणाला एक मर्यादा असली पाहिजे, जर आपण गरजेपेक्षा जास्त चांगुलपणा दाखवला, तर कधीकधी तोच गुण आपली कमजोरी बनू शकतो आणि लोक आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ शकतात, असा इशारा आचार्य चाणक्य देतात.
तुमची सहज फसवणूक होऊ शकते : जर ‘नाही’ म्हटल्याने इतरांच्या भावना दुखावतील या विचाराने तुम्ही प्रत्येक गोष्टीला होकार देत असाल किंवा प्रत्येक गोष्टीला होकार देऊन अति दयाळूपणा दाखवत असाल, तर तुमची सहज फसवणूक होऊ शकते. लोक त्यांच्या स्वतःच्या स्वार्थी हेतूंसाठी तुमचा वापर करण्याची शक्यता असते. शिवाय, जर तुम्ही तुमची मते धैर्याने मांडू शकत नसाल, तर इतर लोक तुम्हाला कमकुवत समजतील.
तुम्हाला इतरांच्या स्वार्थासाठी स्वतःचा त्याग करावा लागेल: जर तुम्ही खूप चांगले असाल, तर तुम्ही लवकरच इतरांच्या स्वार्थाचे बळी ठराल. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त चांगुलपणा दाखवला, तर कधीकधी तोच गुण तुमची कमजोरी बनू शकतो. त्यामुळे, परिस्थितीचा विचार करून वागणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
संधी गमावल्या जातात: जेव्हा तुम्ही नेहमी इतरांशी चांगले वागण्याच्या नादात इतरांच्या संधी सोडून देता, तेव्हा तुमच्याकडे येणाऱ्या उत्तम संधी तुम्ही गमावून बसता. याचा अर्थ असा की, इतर लोक आयुष्यात पुढे जातील आणि तुम्ही मागेच राहाल. म्हणून कधीही गरजेपेक्षा जास्त चांगलं वागू नका. चांगुलपणा चांगलाच असतो, पण अति चांगुलपणा तुमच्यासाठी केवळ अडथळा ठरेल. म्हणून तुमच्या यशासाठी कठोर परिश्रम करा.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)