Headlines

Pranit More : पोलिसांनंतर राष्ट्रीय महिला आयोगाचीही दखल, प्रणित मोरेचं करिअर संपुष्टात? कॉन्ट्रोव्हर्सीमुळे या इन्फ्लुएन्सर्सचंही करिअर आलेलं धोक्यात

Pranit More : पोलिसांनंतर राष्ट्रीय महिला आयोगाचीही दखल, प्रणित मोरेचं करिअर संपुष्टात? कॉन्ट्रोव्हर्सीमुळे या इन्फ्लुएन्सर्सचंही करिअर आलेलं धोक्यात
Pranit More : पोलिसांनंतर राष्ट्रीय महिला आयोगाचीही दखल, प्रणित मोरेचं करिअर संपुष्टात? कॉन्ट्रोव्हर्सीमुळे या इन्फ्लुएन्सर्सचंही करिअर आलेलं धोक्यात


हिमांशू जांग्रा, प्रणित मोरे आणि डॉ. सेजल पवारImage Credit source: Instagram

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोदरम्यान झालेल्या ‘370 रुपयांच्या बिर्याणी’च्या वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद आता राष्ट्रीय महिला आयोगापर्यंत (NCW) पोहोचला आहे. एकीकडे महाराष्ट्र सायबर सेलं प्रणित मोरे आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या हिमांशू जांग्रा या तरुणाविरोधात एफआयआर दाखल केली असताना आता राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेची दखल घेत कठोर भूमिका मांडली आहे. या घटनेसंदर्भातील मीडिया रिपोर्ट्स आणि व्हायरल व्हिडीओंची दखल घेत आयोदाने हरियाणाच्या पोलीस महासंचालकांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने गुरूवारी कॉमेडियन प्रणित मोरे आणि वेब डेव्हलपर हिमांशू जांगरा यांना समन्स बजावले आहेत. आयोगाने या घटनेवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

गुरुग्राममध्ये झालेल्या स्टँडअप कॉमेडी शोदरम्यान केलेल्या काही टिप्पण्यांमुळे महिलांवरील लैंगिक छळ आणि संमतीशिवाय होणाऱ्या लैंगिक संबंधांना नॉर्मलाइज केलं जात आहे किंवा अशा गोष्टींचा गौरव केला जातोय, असा आरोप महिला आयोगाने केला. ‘महिलांच्या संमती, प्रतिष्ठ आणि वैयक्तिक स्वातंत्र्यावर परिणाम करणाऱ्या वर्तनाला सामान्य ठरवणं किंवा त्याचं उदात्तीकरण करणं, याचा समाजावर नकारात्मक परिणाम होतो आणि अशा बाबी हलकेपणाने घेता येणार नाहीत’, असं आयोगाने म्हटलंय. या घटनेच्या बातम्या आणि व्हिडीओंची स्वत:हून दखल घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी हरियाणाच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे. आयोगाने सात दिवसांच्या आत सविस्तर कारवाई अहवालदेखील (ATR) मागवला आहे, ज्यामध्ये भारतीय दंड संहिता आणि इतर संबंधित कायद्यांनुसार या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला आहे की नाही याचाही समावेश असेल. आयोगाने या प्रकरणात प्रणित मोरे आणि हिमांशू जांग्रा यांनाही नोटीस बजावली आहे. या दोघांनाही 22 जून रोजी दुपारी 4 वाजता राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर राहण्यासाठी बोलावण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं?

‘बिर्याणीचे 370 रुपये भरले आहेत, मग ते वसूल करायला नको का’, असं वादग्रस्त वक्तव्य हिमांशु जांग्रा नावाच्या तरुणाने कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये केलं होतं. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यावरून सर्वच स्तरातून तीव्र टीका झाली. प्रणित मोरेच्या शोमध्ये हिमांशूने सांगितलं होतं की तो एका मुलीसोबत डेटवर गेला होता. तिथे त्याने 370 रुपयांची चिकन बिर्याणी खाल्ली होती. बिर्याणी खाल्ल्यानंतर त्या मुलीने घरी सोडण्याची विनंती केली तेव्हा बिर्याणीसाठी भरलेले 370 रुपये वसूल करायला हवेत, म्हणून त्याने मुलीला घरी सोडण्यास नकार दिला आणि त्याच्यासोबत एका पार्कमध्ये येण्याची विनंती केली. पार्कमध्ये गेल्यानंतर त्याने रात्र होण्याची वाट पाहिली आणि संधी साधून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. हा किस्सा ऐकल्यानंतर प्रणित मोरेसह उपस्थित सर्वजण हसू लागले.

एफआयआर दाखल

प्रणित मोरेच्याच शोमध्ये डॉ. सेजल पवार नावाची एक तरुणी मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्ट्सबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विनोद करताना दिसली. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे, हिमांशू जांग्रा, डॉ. सेजल पवार आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहिता 2023 च्या कलम 75(1)(iv), 75(3), 294, 353(2) तसंच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच आपले जबाब नोंदवण्यासाठी महाराष्ट्र सायबर न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देणारे समन्ससुद्धा या तिघांना बजावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सायबरनेदेखील कंटेंट क्रिएटर्स आणि डिजिटल इन्फ्लुएन्सर्सना ऑनलाइन कंटेंट तयार करताना कायदेशीर चौकटींचं पालन करण्याचं आवाहन करणारी सूचना जारी केली आहे.

माफीनामा

याप्रकरणी हिमांशूला त्याच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. तर सेजलने सोशल मीडियावर माफी मागणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती म्हणाली, “तो व्हिडीओ पुन्हा पाहिल्यावर माझ्या बोलण्यामुळे लोक का नाराज झाले आहेत हे मला पूर्णपणे समजलं आहे. मी जाणूनबुजून असं काही बोलेन असा माझा कधीच विचार नव्हता. कोणाचाही अनादर करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. तो माझा पहिलाच स्टँड अप शो होता. माझं काय चुकलं हे मला समजलंय आणि त्याबद्दल मी मनापासून माफी मागते. मी असं पुन्हा कधीही होऊ देणार नाही.”

संबंधित तरुणाला प्रणितने थांबवलं नाही, तर तोसुद्धा जोरजोरात हसू लागला. ही क्लिप जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली, तेव्हा त्यावर सर्वच स्तरांतून तीव्र संताप व्यक्त झाला. मात्र अशा प्रकारे एखाद्या इन्फ्लुएन्सर किंवा कंटेंट क्रिएटरला वादामुळे लोकांच्या रोषाचा सामना करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकजण त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि कृतींमुळे चर्चेत आले आहेत.

समय रैना- ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कॉमेडियन समय रैनाच्या युट्यूबवरील शोमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या शोच्या एका एपिसोडमध्ये पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मुखिजा यांनी पालक आणि शारीरिक संबंधांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील टिप्पणी कली होती. हा व्हिडीओ व्हायरल होताच इंटरनेटवर प्रचंड प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. आसाम आणि महाराष्ट्र सायबर पोलिसांनी समय रैना, रणवीर आणि अपूर्वा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केले होते. अखेर समय रैनाला त्याच्या युट्यूबवरील या शोचे सर्व एपिसोड्स कायमचे काढून टाकावे लागले.

एल्विश यादव- सर्वांत प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवने बिग बॉसचाही सिझन जिंकला होता. मात्र त्यानंतर तो अनेक मोठ्या आणि गंभीर वादांमध्ये अडकला. रेव्हा पार्टीमध्ये सापाच्या विषाचा पुरवठा असो किंवा इतर युट्यूबर्सना मारहाण आणि धमक्या देणारे त्याचे व्हिडीओ असोत, एल्विश सतत कायदेशीर अडचणींमध्ये अडकत होता. त्यानंतर झालेल्या पोलीस कारवाई आणि तुरुंगवासामुळे त्याला मोठा फटका बसला.

मुनव्वर फारुकी- 2021 मध्ये इंदूरमधील एका शोदरम्यान धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून मुनव्वरला जवळपास एक महिना तुरुंगात काढावा लागला होता. यामुळे त्याचे अनेक शोज रद्द झाले आणि त्याचं करिअर संपुष्टात येण्याच्या मार्गावर आलं होतं. नंतर बिग बॉस या शोमधून त्याने पुनरागमन केलं. मात्र या शोमध्येही तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि एकाच वेळी अनेकांना डेट करत असल्याच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *