Headlines

आयपीएलमधील स्टार खेळाडू गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर, टी20 संघ तयार होईल अशी ताकद

आयपीएलमधील स्टार खेळाडू गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर, टी20 संघ तयार होईल अशी ताकद
आयपीएलमधील स्टार खेळाडू गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर, टी20 संघ तयार होईल अशी ताकद


आयपीएलमधील स्टार खेळाडू गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर, टी20 संघ तयार होईल अशी ताकदImage Credit source: PTI

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू आहे आणि अनेक खेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या खेळाडूंची कामगिरी पाहता त्यांना टीम इंडियात जागा मिळू शकते. एकच फॉर्मेट नाही तर तिन्ही फॉर्मेटमध्ये जाग मिळवण्याची ताकद आहे. पण यापैकी बहुतांश खेळाडू असे आहेत की त्यांना वर्षानुवर्षे टीम इंडियात जागा मिळेल याची प्रतीक्षा आहे. कधी काळी संघाचा भाग असलेले हे खेळाडू आता प्रतीक्षेत आहेत. मात्र बरीच वर्षे उलटली तरी जागा मिळेना अशी स्थिती आहे. अशाच 11 खेळाडूंची एक यादी तयार केली आहे. हे खेळाडू आयपीएल स्पर्धेत वेगवेगळ्या संघांकडून खेळत आहेत. त्यांची कामगिरी पाहता टीम इंडियाची एक वेगळी आणि तगडी टी20 इलेव्हन तयार होऊ शकते. चला जाणून घेऊयात…

देवदत्त पडिक्कल : 25 वर्षीय डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कल टॉप ऑर्डर फलंदाज आहे. 2021 मध्ये त्या टीम इंडियात पदार्पण केलं होतं. इतकंच काय तर 2024 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. नोव्हेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटी खेळल्यानंतर टीम इंडियातून बाहेर आहे. सध्या आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळत आहे आणि चांगली कामगिरी करत आहे.

पृथ्वी शॉ: भारतीय क्रिकेटमधील टॅलेंटेड खेळाडू म्हणून पृथ्वी शॉचं नाव घेतलं जातं. पण प्रतिभेसोबत शिस्तही तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे त्याच्या कारकिर्दिला ब्रेक लागला. त्याला भारतीय संघातून वगळण्यात आलं, इतकंच काय तर आयपीएल स्पर्धेत प्लेइंग 11 मध्ये जागा मिळवणं कठीण झालं आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्याला 75 लाखांना विकत घेतलं, पण एकही सामन्यात खेळला नाही. त्याला भारतीय संघातून वगळून पाच वर्षांचा काळ लोटला आहे.

रजत पाटीदार: आरसीबी संघाची धुरा सांभाळणारा रजत पाटीदार गेल्या दोन वर्षांपासून संघाबाहेर आहे. आयपीएल 2026 मध्ये त्याची कामगिरी पाहता लवकरच प्रतीक्षा संपेल असं वाटत आहे. रजत पाटीदार फेब्रुवारी 2024 मध्ये एक कसोटी सामना खेळला होता.

सरफराज खान: चेन्नई सुपर किंग्सकडून सरफराज खानला खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण भारतीय संघात खेळून बराच काळ लोटला आहे. भारतासाठी सहा कसोटी खेळला आहे. त्याने नोव्हेंबर 2024 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

कृणाल पांड्या : अष्टपैलू कृणाल पांड्याने 2018 मध्ये भारतीय संघात पदार्पण केलं. त्याने 2018 ते 2021 या काळात पाच वनडे आणि 19 टी20 सामने खेळले. पण संघातून वगळल्यानंतकर त्याला परत संधी मिळाली नाही. पण आरसीबीकडून खेळताना चांगली कामगिरी करत आहे.

वेंकटेश अय्यर : भारतीय संघाकडून 2021 मध्ये पदार्पण केलं होतं. त्याने दोन वनडेसह 11 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 2022 पासून संघात नाही आणि पुनरागमनच्या प्रतीक्षेत आहे. आयपीएल स्पर्धेत आरसीबीचा भाग आहे.

युजवेंद्र चहल : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2016 पासून युजवेंद्र चहल खेळत आहे. ऑगस्ट 2023 पासून भारतीय संघाचा भाग नाही. आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्सकडून खेळत आहे. चहल फिरकीने आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे.

वेगवान गोलंदाजांचा चमू

आयपीएल स्पर्धेत चमकदार कामगिरी करून काही वेगवान गोलंदाजांनी लक्ष वेधून घेतलं आहे. आरसीबीकडून खेळणारा भुवनेश्वर कुमार गेल्या चार वर्षांपासून भारतीय संघात नाही. दिल्ली कॅपिटल्सचा टी नटराजन पाच वर्षांपासून, राजस्थान रॉयल्सचा संदीप शर्मा एक दशकापासून संघाचा भाग नाही. हे खेळा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *