Headlines

Strait Of Hormuz : सुपरपावर अमेरिकाच नाही, तर जगातला कुठलाही देश स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये का घुसू शकत नाही?

Strait Of Hormuz : सुपरपावर अमेरिकाच नाही, तर जगातला कुठलाही देश स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये का घुसू शकत नाही?
Strait Of Hormuz : सुपरपावर अमेरिकाच नाही, तर जगातला कुठलाही देश स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये का घुसू शकत नाही?


इराण विरुद्ध युद्ध सुरु झाल्यानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुजचं महत्व सगळ्या जगाच्या लक्षात आलं आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजचा रणनितीक फायद्यासाठी अशा पद्धतीने वापर होईल, असा युद्ध सुरु होण्याआधी क्वचितच कुठल्या देशाने विचार केला असेल. जर, कुठल्या देशाला अशी कल्पना असती, तर त्यांनी आधीच तेलाचे साठे करुन ठेवले असते. तेलाच्या टंचाईमुळे लॉकडाऊन सारख्या उपायोजना कराव्या लागल्या नसत्या. अमेरिका आणि इस्रायल या दोन बलाढ्य देशांसमोर तुलनेने इराणची सैन्य शक्ती कमी आहे. पण आपल्याकडे जे आहे, त्याचा खुबीने कसा वापर करायचा? त्याचं कौशल्य या युद्धात इराणकडून शिकावं लागेल. इस्रायल-अमेरिकेकडे जगताली शक्तीशाली फायटर जेट्स, बॉम्ब आहेत. इराणकडे लढाऊ विमानं नाहीत. त्यांच्याकडे दोनचं मुख्य अस्त्र होती. शाहेद ड्रोन आणि वेगवेगळ्या रेंजची मिसाईल्स आणि तिसरं अस्त्र म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुज.

इराणने शाहेद ड्रोन्स आणि मिसाइल्सच्या बळावर अमेरिका-इस्रायलशी झुंज दिली. महिन्याभराच्या आत इराण कोसळले हे अनेकांचा अंदाज चुकला. उलट 38 दिवसाच्या युद्धानंतरही इराण मजबुतीने अमेरिका-इस्रायल या देशांसमोर उभा होता. सध्या दोन आठवड्यांचा सीजफायर आहे. त्यामुळे युद्ध थांबलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वेगवेगळ्या मार्गाने इराणवर दबाव टाकत आहेत. पण इराण अजूनही मागे हटत नाहीय. उलट तो ट्रम्प यांच्या प्रत्येक धमकीला जशास तसं उत्तर देत आहे. अमेरिकेने पुन्हा लढाई सुरु केली, तर इराणही तयार आहे. कुठल्याही युद्धात हल्ले-प्रतिहल्ले यापेक्षा रणनिती म्हणजे स्ट्रॅटजी, कूटनिती महत्वाची असते. आज इराणची स्ट्रॅटजी म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुज आहे.

धमक्यांचा काहीएक परिणाम झाला नाही

इराणने युद्ध सुरु झाल्यानंतर सर्वप्रथम स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद करुन टाकलं. 28 फेब्रुवारीच्या आधी स्ट्रेट ऑफ हॉर्मुज मधून बिनदिक्कत जलवाहतूक चालायची. पण युद्ध सुरु होताच इराणने हा जलमार्ग आपल्या नियंत्रणाखाली घेतला. तिथून चालणारी जलवाहतूक रोखून धरली. परिणामी अनेक देशांना आपली जहाजं हॉर्मुज मधून बाहेर काढण्यासाठी चर्चा करावी लागली. त्यांची मंजुरी आवश्यक बनली. यामुळे आपोआप अमेरिका-इस्रायलवर दबाव आला. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील इराणची नाकेबंदी तोडण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांना आवाहनं केली, धमक्या दिल्या. पण काहीएक परिणाम झाला नाही. अमेरिकेला स्वत:ला स्ट्रेट ऑफ हॉर्मुज अजून ओपन करता आलेलं नाही.
हॉर्मुज स्ट्रेट हा जगातील एक महत्वाचा तेल मार्ग आहे. जगातील 20 टक्के तेलाची आणि गॅसची वाहतूक याच मार्गावरुन होते. दररोज कोट्यावधी बॅरल तेल याच स्ट्रेटमधून पास होतं.

अमेरिका तिथे घुसू शकत नाही

अमेरिकेला सुपर पावर म्हटलं जातं. अमेरिकेकडे जगातील शक्तीशाली नौदल आहे. अत्याधुनिक युद्धनौका, समुद्री उपकरणं आहेत. मग, असं असूनही अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांना स्ट्रेट ऑफ हॉर्मुज अजून का ओपन करता आलेलं नाही. या स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये असं काय आहे, की अमेरिका तिथे घुसू शकत नाही. स्ट्रेट ऑफ हॉर्मुज खुला करणं अमेरिकेसह जगातील कुठल्याही देशासाठी इतकं आव्हानात्मक आहे. हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुज नेमका आहे कसा ? ते समजून घेऊया.

रशिया-युक्रेन युद्धातून काही महत्वपूर्ण धडे घेतले

इराणने रशिया-युक्रेन युद्धातून काही महत्वपूर्ण धडे घेतले आणि त्या आधारावर आपली रणनिती बनवली. स्ट्रेट ऑफ हॉर्मुज इराणसाठी नैसर्गिक सुरक्षा कवचाचं काम करतं. इराणच्या लांबलचक वाकड्या-तिकड्या पसरलेल्या किनारपट्टीवर डोंगर, गुफा आणि बोगदे आहेत. इराणला तिथे आपली शस्त्र, मिसाइल आणि ड्रोन लपवून ठेवता येतात.

मिसाइल लॉन्च साइट म्हणून वापर करता येतो

उंच डोंगर रागांमुळे इराणला नैसर्गिक वरचढ होण्याची संधी मिळते. डोंगराच्या आड लपून शत्रुच्या जहाजाला सहज लक्ष्य करता येतं. त्या शिवाय इराणकडे अजून छोटी-छोटी बेटं आहेत. ज्यांचा मिसाइल लॉन्च साइट म्हणून वापर करता येतो. केश्म बेटावर इराणची मोठ्या प्रमाणात सैन्य उपस्थिती आहे.

hormuz

मोठ्या युद्धनौका तिथे फिरू शकत नाहीत

अमेरिकन मरीन कमांडो आणि नौदलाला स्ट्रेट ऑफ हॉर्मुज खुलं करायचं असेल तर अनेक मोठ्या समस्यांचा सामना करावा लागेल. काही ठिकाणी पाणी फार खोल नाहीय. त्यामुळे मोठ्या युद्धनौका तिथे फिरू शकत नाहीत. दुसऱ्याबाजूला इराणकडून डागली जाणारी मिसाइल्स आणि ड्रोन हल्ल्याचा धोका कायम असतो.

अनेक एन्ट्री आणि एग्जिट पॉइंट मिळतात

वाकडी-तिकडी किनारपट्टी आणि डोंगरात लपवून ठेवलेल्या शस्त्रांद्वारे इराणी सैनिक छोटे हल्ले करुन लगेच गायब होऊ शकतात. लांब किनारपट्टीमुळे इराणला हल्ल्यासाठी अनेक एन्ट्री आणि एग्जिट पॉइंट मिळतात. त्यामुळे अमेरिकेच्या मोठमोठ्या युद्धनौकांना त्रास देणं त्यांच्यासाठी सोपं आहे.

Strait Of Hormuz

इराणने ही गोष्ट शिकून घेतली

रशिया-युक्रेन युद्धात हे दिसून आलं की, छोटे-छोटे ड्रोन्स, मिसाइल्स आणि एसिमेट्रिक युद्धाने मोठ्या शक्तींचं सुद्धा भरपूर प्रमाणात नुकसान केलं जाऊ शकतं. इराणने ही गोष्ट शिकून घेतली. ते आता आपल्या किनारपट्टीवर छोटी शस्त्र आणि मिसाइल्सचं जाळं विणत आहेत.

इराण सुद्धा याच नितीवर चालतोय

युक्रेन युद्धात रशियाने हे पाहिलं की, स्वस्तातल्या ड्रोनने कशा प्रकारे महागड्या युद्धनौकेच नुकसान होऊ शकतं. इराण सुद्धा याच नितीवर चालत आहे. अमेरिकेच्या अब्राहम लिंकन आणि दुसऱ्या युद्धनौकांवर छोट्या शाहेद ड्रोन्सनी हल्ले करत आहे.

म्हणून पर्यायी मार्गाचा शोध

स्ट्रेट ऑफ हॉर्मुजच्या आसपास सौदी अरेबिया, बहरीन, कतर आणि UAE या देशांच्या महत्वाच्या तेल रिफायनरीज, टर्मिनल आहेत. युद्ध सुरु झाल्यानंतर इराणकडून पुन्हा या रिफायनरीजना लक्ष्य केलं जाऊ शकतं. भौगोलिक स्थितीमुळे इराणला काही Advantages आहेत. पर्शियन गल्फ सागरात ओमान आणि इराणमध्ये हे हॉर्मुज स्ट्रेट विभागलेलं आहे. हा अरुंद सागरी मार्ग असल्याने इराण अगदी सहजपणे बाहेर जाणाऱ्या जहाजाचा मार्ग अडवू शकते. अमेरिकी सैन्य स्ट्रेट ऑफ हॉर्मुज मध्ये घुसलं तर त्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून पर्यायी मार्गाचा शोध घेतला जात आहे.

म्हणून इराणला नमवणं इतकं सोपं नाही

स्ट्रेट ऑफ होर्मुज इराणसाठी एक नैसर्गिक किल्ला आहे. शत्रुला इथे घुसणं खूप महाग पडू शकतं. म्हणून उद्या अमेरिका किंवा अन्य देशाने हा मार्ग खुला करण्याचा प्रयत्न केला तर ते महाग पडू शकतं. म्हणून इराणला नमवणं इतकं सोपं नाही. तुमच्याकडे मोठं सैन्य, आधुनिक शस्त्र आहेत म्हणून तुम्ही जिंकू शकत नाही. स्मार्ट भूगोल आणि स्वस्त शस्त्र सुद्धा निर्णायक ठरु शकतात. हेच इराण युद्धाने दाखवून दिलय.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *