Headlines

इराणचा अमेरिकेच्या बेसवर अत्यंत मोठा हल्ला, ज्याची भीती तेच घडले, तब्बल इतके सैनिक..

इराणचा अमेरिकेच्या बेसवर अत्यंत मोठा हल्ला, ज्याची भीती तेच घडले, तब्बल इतके सैनिक..
इराणचा अमेरिकेच्या बेसवर अत्यंत मोठा हल्ला, ज्याची भीती तेच घडले, तब्बल इतके सैनिक..


इराण आणि अमेरिका यांच्यात स्थिती नाजूक आहे. दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, यादरम्यानच इराणकडून धक्कादायक पाऊल उचलण्यात आले. अमेरिकेने काही दिवसांपूर्वी केलेल्या हल्ल्याचा बदला घेतल्याचे इराणकडून सांगण्यात आले. अमेरिकी लष्कर तळ असलेल्या ठिकाणी हा हल्ला इराणने केला. मिळालेल्या माहितीनुसार, इराणकडून करण्यात आलेला हा ड्रोन हल्ला आहे. या हल्ल्यात काही अमेरिकन सैनिक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. MQ-9 रीपर ड्रोनही खराब करण्यात आले. इराण आणि अमेरिका युद्धविरामच्या अत्यंत जवळ असल्याने हा हल्ला झाल्याने एकच हाहाकार उडाला. इराणी इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने अमेरिकेच्या एअर बेसला निशाना बनवले. इराणच्या अब्बास बंदराला टार्गेट करून अमेरिकेकडून हल्ले करण्यात आला. आता त्याच हल्लाचा बदला अमेरिकेने घेतला.

इराणी सरकारी मीडियाच्या रिपोर्टनुसार, ही उत्तर देणारी कारवाई होती. अमेरिकेने केलेल्या हल्ल्याविरोधात ही कारवाई होती. या हल्ल्याबाबत अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली. 24 तासात इराणकडून कुवेत येथे असलेल्या अली अल सलेम एअर बेसवर बॅलिस्टिक मिसाईल हल्ला झाला. कुवेत एअर डिफेंस सिस्टमने हल्ला हवेतच रोखला. पण त्याचा त्याचा काही भाग एअर बेसमध्ये येऊन पडला. त्यामुळे काही अमेरिकन सैनिक जखमी झाले.

अमेरिकेचे दोन महत्वाचे MQ-9 ड्रोन ज्याची किमत जवळपास 3 कोटी आहे. ज्याचे मोठे नुकसान झाले. हे ड्रोन खराब झाल्याने अमेरिकेच्या लष्कराला मोठा झटका बसला. कारण हे ड्रोन अमेरिकेच्या लष्करातील अत्यंत महत्वाचे आहे. सुरक्षेकरिता हे ड्रोन अत्यंत महत्वाचे मानले जाते. अमेरिकेचे अध्यक्षांनी तब्बल दोन तास इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध रोखण्याकरिता बैठक घेतली.

युद्धविरामवर चर्चा झाली. दोन्ही देशांकडून युद्धविरामाबाबत घोषणा होण्यापूर्वीच अशाप्रकारे हल्ले केले जात आहेत. इराण आणि अमेरिका युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबले पाहिजे, ही जगाची इच्छा आहे. तशी महत्वपूर्ण चर्चा देखील सुरू आहे. मात्र, अजूनही दोन्ही देशांमध्ये तणाव कमी आहे. होर्मुज खाडी गेल्या तीन महिन्यापेक्षा अधिक काळापासून बंद आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *