Headlines

कापलेली फळं जास्त वेळ राहतील ताजी आणि चवदार, फक्त ‘या’ सोप्या घरगुती उपायांचा करा वापर

कापलेली फळं जास्त वेळ राहतील ताजी आणि चवदार, फक्त ‘या’ सोप्या घरगुती उपायांचा करा वापर
कापलेली फळं जास्त वेळ राहतील ताजी आणि चवदार, फक्त ‘या’ सोप्या घरगुती उपायांचा करा वापर


फळांचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. म्हणूनच डॉक्टरसुद्धा फळे खाण्याचा सल्ला देतात. अशातच रोजच्या धावपळीत अनेकजण फळं कापून ऑफिस किंवा कॉलेजमध्ये घेऊन जातात. त्याच वेळी बऱ्याच वेळानंतर कापलेली फळं खाल्ल्याने त्यांची चव खराब झालेली असते आणि काळी देखील पडतात. पण तुम्ही काही उपायांचा टिप्सचा अवलंब केल्यास कापलेली फळं दीर्घकाळ ताजी ठेवू शकाल. त्याच बरोबर फळांची चव आणि रंग तासंतास खराब होणार नाही. यासोबतच तुम्ही काही खबरदारी देखील घेतली पाहिजे. चला तर मग आजच्या लेखात आपण काही टिप्सबद्दल जाणून घेऊयात.

फळे कापल्यानंतर बराच वेळ ताजी आणि चवदार राहावी यासाठी तुम्ही पाण्याच्या या एका मिश्रणात भिजवून ठेवावीत. हे मिश्रण तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी उकळावा. त्यात थोडा लिंबाचा रस आणि अगदी थोडी साखर टाका. सर्वकाही व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता या पाण्यामध्ये कापलेली फळं थोडा वेळ ठेवा आणि नंतर बाहेर काढा.

असे केल्याने फळे जास्त वेळ ताजी राहू शकतात. लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी फळांचे ऑक्सिडेशन करते. यामुळे फळे लवकर काळी पडण्यापासून वाचतात. साखर फळांचा गोडवा टिकवून ठेवण्यास मदत करते. तुम्ही सफरचंद आणि पपईसारख्या फळांवर थेट लिंबाचा रस देखील लावू शकता. जास्त मीठ वापरणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर फळं खारट लागू शकतात. यानंतर फळे पाण्यातून काढून हवाबंद डब्यात ठेवा.

मधाचा वापर देखील उपयुक्त

कापलेली फळं ताजी ठेवण्यासाठी तुम्ही मधाचा वापर देखील करू शकता. कोमट पाण्यात मध मिक्स करा. त्यानंतर त्यात चिरलेली फळं काही सेकंदांसाठी टाका आणि काही वेळातच ही फळं काढून फ्रिजमध्ये हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे फळांची चव टिकून राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त फळे धुताना बर्फाच्या पाण्याचा वापर करा. धुतलेली फळं कोरडी करून झिप लॉक बॅगमध्ये ठेवा आणि फ्रिजमध्ये ठेऊ शकता.

ही खबरदारी घ्या

बऱ्याच वेळांनी कापलेली फळं खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे फळं कापल्यानंतर लगेच खाण्याचा प्रयत्न करा. अधिक वेळ फळं कापून ठेवल्याने त्यातील पौष्टिक मूल्य आणि फायदे कमी होतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *