Headlines

कोकणात ठाकरेंच्या सेनेला मोठा झटका! गळाभेट, जिल्हाधीकारी कार्यालय अन् नितेश राणेंनी टप्प्यात केला कार्यक्रम

कोकणातील विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे कोकणातील निवडणूक चुरशीची होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, मंत्री नितेश राणे यांनी थेट बाळ माने यांच्याशी संपर्क साधत राजकीय समीकरणे बदलली.

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नितेश राणे स्वतः बाळ माने यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. त्यानंतर बाळ माने यांनी अधिकृतपणे अर्ज मागे घेतला. या घडामोडींमुळे महायुतीचा विजयाचा मार्ग आता अधिक सोपा झाल्याचे मानले जात आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर कोकणातील राजकारणात नितेश राणे यांच्या राजकीय चातुर्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *