Headlines

खबरदार इराणमध्ये जाऊन भारताविरोधात बोलाल तर… काश्मिरी धर्मगुरुंची अट मान्य करण्यास नकार, थेट खामेनेई यांच्या..

खबरदार इराणमध्ये जाऊन भारताविरोधात बोलाल तर… काश्मिरी धर्मगुरुंची अट मान्य करण्यास नकार, थेट खामेनेई यांच्या..
खबरदार इराणमध्ये जाऊन भारताविरोधात बोलाल तर… काश्मिरी धर्मगुरुंची अट मान्य करण्यास नकार, थेट खामेनेई यांच्या..


इराणचे सर्वाेच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या अंत्ययात्रेचे मोठे आयोजन करण्यात आले. या अंत्ययात्रेत लाखो लोक सहभागी होणार आहेत. इराणकडून भारतातील 5 लोकांना या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आले. इराणमधून इराकमध्ये सीमापार करून अत्यंयात्रा दाखल होईल. भारतातील 5 लोकांना या अत्यंयात्रेत सहभागी होण्याकरिता खास विमान भारतात पाठवण्यात आले. मात्र, शियाचे प्रमुख धर्मगुरू आणि हुर्रियत कॉन्फ्रेंसचे कार्यकारी सदस्य आगा सय्यद हसन मुसावी यांना नवी दिल्ली विमानतळावरील इराणी विमानात बसण्यापासून रोखण्यात आले. आगा हसन यांना अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या जनाजामध्ये सहभागी होण्याकरिता खास आमंत्रित करण्यात आले होते. आगा हसन यांचा मुलगा आणि पीडीपी आमदार आगा मुंतजिर मेहदी यांनी सांगितले की, दिल्ली इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांच्या वडिलांना विमानात चढू दिले नाही.

मुंतजिर यांनी दावा केला की, अधिकाऱ्यांनी आगा हसन यांच्यासमोर मोठी अट ठेवली. त्यांना इराणला जाण्याची परवानगी तेव्हाच मिळाले, ज्यावेळी ते ही अट मान्य करतील की, ते इराणमध्ये जाऊन भारताविरोधात काहीच बोलणार नाहीत. काश्मीरमध्ये झालेली अटक यावरही ते कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नाहीत. यादरम्यान मुंतजिर यांनी म्हटले की, माझ्या वडिलांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की, मी तिथे जनाजामध्ये सहभागी होण्यासाठी जात आहे.

मी तिथे कोणतेही भाषण देणार नाहीये. मात्र, यादरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांची अट मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांनी हसन यांचा पासपोर्ट जप्त केला. श्रीनगरच्या पासपोर्ट अधिकाऱ्यांना सीजर मेमो पाठवला. इमिग्रेशन ब्युरोचे अधिकारी संजय सिंह यांनी मेमोमध्ये लिहिले की, आगा सय्यद हसन मुसावी नावाच्या व्यक्तीचा पासपोर्ट जप्त करण्यात आला.

पुढच्या कारवाईसाठी तो आम्ही श्रीनगर आरपीओला पाठवला आहे. आगा हसन यांच्यासोबतच या जनाजामध्ये भारतातील पाच प्रमुख लोकांना बोलावण्यात आले. इराणी सरकारने पाठवलेल्या विमानात महबूबा मुफ्ती आणि इमरान अंन्सारी यांना जाण्याची परवानगी भारत सरकारकडून देण्यात आली. अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला केला होता, त्यात अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात त्याच्या घरातील इतरही काही सदस्य ठार झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *