
इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. अमेरिकेने इराणी बंदरांवरील नाकेबंदी कायम राहील अशी घोषणा केल्यानंतर इराणनेही होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केलीआहे. इराणच्या या भूमिकेनंतर आता जागतिक पातळीवर उर्जा संकटाचं वास्तव आणखी गहिरं होण्याची शक्यता वाढली आहे. इराण आणि भारताचे संबंध सलोख्याचे आहेत. परंतु आता इराणने भारताच्या तेलवाहू जहाजांवरही हल्ले केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता भारताला चिंताजनक ठरणारी एक व्हिडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. या व्हिडीओमध्ये इराणकडून भारतीय जहाजांना इशारा दिला जात असल्याचे दिसत आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC ने शनिवारी भारताच्या एका जहाजाला रोखले होते. हे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतात येत होते. या जहाजाला इराणने लवकरात लवकर परत जावे, असा इशारा दिला होता. इराणच्या या भूमिकेंतर एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत इराणी नौसेनिकांचा इशारा आणि भारतीय जहाजच्या कॅप्टनचा संवाद ऐकायला येत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यावर अजूनही बंदीच आहे. तुम्ही लवकरत लवकर परत तुमच्या बंदरावर जावे, असा इशारा आयआरजीसीचे नौसैनिक देताना दिसत आहेत.
होर्मुझ संध्या बंद तुम्ही…
व्हिडीओणध्ये गो टू बॅक इमिडियटली असे इराणचे अधिकारी बोलत आहेत. त्याला भारताच्या कॅप्टनने उत्तर दिले आहे. ‘ठिक आहे तुम्ही मला जे सांगितले त्याचा उच्चार मी पुन्हा करतो. होर्मुझची सामुद्रधुनी सध्या बंद आहे, ओके सर,’ असे भारतीय जहाजाचा कॅप्टन बोलताना दिसतोय. या संभाषणानंतर भारतीय जहाजाने लगेच आपल्या जहाजाचा मार्ग बदलला.
‼️‼️🇮🇷 BREAKING | The IRGC tells the cargo vessel “Bhagya Laxmi” to turn back from the Strait of Hormuz, as it does not have permission to cross.
The vessel complies and turns back.
Bhagya Laxmi (IMO: 9351816) has an all-Indian crew. Under tha flag of Antigua & Barbuda or the… pic.twitter.com/Caakki67Cl
— Global Spectrum (@GlobalSpectrum_) April 18, 2026
भारतीय जहाजांवर केला होता गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या भाग्यलक्ष्मी या जहाजावरील कॅप्टनने इराणी अधिकाऱ्याशी संवाद साधल्याची ही क्लिप आहे, अशी माहिती समोर आल आहे. जहाजाच्या क्रू मेंबरनेच हा व्हिडीओ शेअर केला आहे. याआधी इराणने भारतीय झेंडा असणाऱ्या दोन जहाजांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नव्हते. असे असतानाच ही व्हिडीओ क्लिप समोर आली आहे. त्यामुळे इराणने होर्मुझबाबत आक्रमक पवित्रा धारण केल्याचे बोलले जात आहे.