Headlines

गोव्यात गेल्यानंतर लोकांना दारूची नशा का चढत नाही? तज्ज्ञांनी सांगितलं खूपच शॉकिंग कारण, तुम्हालाही माहिती हवं

गोव्यात गेल्यानंतर लोकांना दारूची नशा का चढत नाही? तज्ज्ञांनी सांगितलं खूपच शॉकिंग कारण, तुम्हालाही माहिती हवं
गोव्यात गेल्यानंतर लोकांना दारूची नशा का चढत नाही? तज्ज्ञांनी सांगितलं खूपच शॉकिंग कारण, तुम्हालाही माहिती हवं


गोवा म्हटलं की तुम्हाला सर्वात आधी काय आठवतं? तर ते म्हणजे गोव्यातील दारू, तेथील बीच आणि पर्यटनासाठी आलेले विदेशी पर्यटक. गोव्यामध्ये सर्वात स्वस्त दारू मिळते. अनेकजण तर फक्त दारूची पार्टी एंजॉय करण्यासाठीच गोव्याला भेट देतात. देश-विदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक गोव्यामध्ये पर्यटनासाठी येतात. नवीन वर्ष आणि नाताळच्या काळात गोवा पर्यटकांच्या गर्दीने फुलून जातो. गोवा पर्यटनासाठी तर प्रसिद्ध आहेच. परंतु त्याचबरोबर गोव्यात मिळणाऱ्या दारूची देखील जोरदार चर्चा सुरू असते. असं देखील म्हटलं जातं की गोव्याच्या दारूची झिंग चढत नाही. त्यावर काही जणांचं असं देखील म्हणणं असतं की, गोव्याची दारू ही हलक्या क्वॉलिटीची असते, त्यामुळे गोव्याच्या दारूची नशा चढत नाही. मात्र यामागे एक वेगळचं कारण सांगितलं जातं.

दारूची झिंग का चढत नाही?

गोव्याच्या दारूबद्दल बोलताना असं म्हटलं जातं की, गोव्यात मिळणाऱ्या दारूचा आसर हा खूप कमी असतो. गोव्यात मिळणाऱ्या दारूची नशा का चढत नाही, या मागचं कारण शोधताना अनेकजण ही दारू हलक्या प्रतिची असल्याचं सांगतात. मात्र हे काही पूर्ण सत्य नाहीये. तुम्हाला दारूची नशा चढणार की नाही हे पूर्णपणे तुम्ही कुठून आणि कोणती दारू खरेदी करत आहात? यावर अवलंबून असते. जर तुम्ही अधिकृत परवानाधारक दारू विक्रेत्यांकडून दारूची खरेदी केली तर तुम्हाला तिच्या क्वालिटीबाबत कुठलीही तक्रार मिळणार नाही.

तज्ज्ञांच्या मते तुम्ही जेव्हा गोव्यात असतात आणि दारू पिता त्यावेळी तिची झिंग तुम्हाला चढत नाही, याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, तेथील वातावरणाचा तुमच्यावर झालेला परिणाम असतो. तज्ज्ञांच्या मते सर्वसामान्य लोक हे व्हिस्की, रम आणि व्होडका सारखी दारू पितात. मात्र जे लोक कायम तणावात असतात, त्यांच्यावर दारूचा परिणाम लगेच होतो. तर जे लोक आनंदासाठी दारू पितात त्यांच्यावर म्हणावा एवढा दारूचा परिणाम होत नाही. गोव्यातही काहीसा असाच प्रकार आहे, तुम्ही गोव्यामध्ये आनंदासाठी गेलेले असता, त्यामुळे तुमचा मूड हा आनंदी असल्यामुळे गोव्यात गेल्यानंतर दारूचा म्हणावा तेवढा परिणाम तुमच्यावर होत नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *