
बऱ्याचवेळा आपण घराभोवती झाडे लावताना मोठ्या चुका करतो. विशेष म्हणजे पूर्ण भागात सुगंध दर्दवळणारी झाडे आपण मोठ्या संख्येने लावतो. मात्र, तीच चूक आपल्या आणि आपल्या कुटुंबियांपैकी किंवा शेजाऱ्यांच्या मृत्यूचे कारण बनू शकते. ज्यामुळे कायम घराजवळ झाडे लावताना चारवेळा विचार करा. आपल्यापैकी बरेच लोक घराजवळ झाडे लावताना अशी झाडे लावतात ज्याचा सुगंध अधिक येतो. मात्र, तीच मोठी चूक आयुष्याचा शेवट ठरते. कायम लक्षात ठेवा की, एक झाड असे आहे, ते सापाचे अत्यंत प्रिय आहे. या झाडाच्या फुलाच्या सुगंधानेच साप येतात. साप जास्तीत जास्त काळ या झाडाच्या अवतीभोवती राहणे पसंत करतात. त्यामुळे चुकूनही सापाचे माहेरघर असलेले हे एक झाड तुम्ही घराभोवती अजिबात लावू नका. सध्या उष्णता अधिक वाढलेली आहे. त्यामुळे साप बिळातून मोठ्या संख्येने बाहेर येतात. त्यामध्येच त्यांचे एक खास झाड आहे, जिथे साप अधिक बसणे पसंत करतात.
जर हे झाड आपल्या घराजवळ असेल किंवा या झाडाची फुले तोडण्याकरिता तुम्ही तिथे जात असाल तर मोठे संकट तुमच्यासमोर आहे. या झाडामध्ये साप दिसूनही येत नाही. त्यामुळे तुम्ही झाडाच्या कितीही जवळ गेले तरीही तुम्हाला समजणार नाही की, या झाडावर साप आहे. अगदी तुम्ही झाडाची फुले जरी तोडत असाल तरीही तुमच्या लक्षात येणार नाही की, आपल्या हाताजवळ साप बसलेला आहे.
धक्कादायक म्हणजे एका वेळी एकच नाही तर एकापेक्षा अधिक साप या झाडावर असू शकतात. तशा यापूर्वी अनेक घटना देखील घडल्या आहेत. या झाडाची फुले देवालाही वाहिली जातात. मोठ्या संख्येने झाडावर फुले येत असल्याने महिला, लहान मुले या झाडाची फुले तोडण्याकरिता या झाडाकडे जातात. मात्र, तिथेच खरा मोठा धोका आहे.
सापाचे माहेरघर असलेले जे झाड दुसरे तिसरे कोणतेही नसून प्राजक्ताचे झाड आहे. प्राजक्ताच्या झाडावर साप असतात. प्राजक्ताच्या झाडाच्या फुलाचा सुगंध सापाला प्रचंड आवडतो. या झाडाच्या भोवती साप कायमच आढळतात. प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध चांगला असला तरीही चुकूनही घराजवळ हे झाड लावणे टाळा. या झाडामुळे सापांचा सहवास अधिक वाढतो. घराजवळ प्राजक्ताचे झाड लावण्यापूर्वी 100 वेळा विचार नक्की करा.