
अमेरिकेत भारतीय जोडप्याला भयानक वागणूकImage Credit source: social media
सोशल मीडियावर अमेरिकेतील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक अमेरिकन माणूस कोणत्याही कारणाशिवाय एका भारतीय जोडप्याशी गैरवर्तन करताना दिसला, त्याने त्यांच्याशी विनाकारण वाद घालत धमकी दिली. या व्हिडिओमधून त्या अमेरिकन माणसाची वंशद्वेषी वृत्ती स्पष्टपणे दिसून आली. भारतीय जोडप्याला दिलेल्या वागणुकीबद्दल संताप व्यक्त करणाऱ्या अनेक कमेंट्स या व्हिडीओमुळे समोर आल्या आहेत.
काय आहे तो व्हिडीओ ?
सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या बराच फिरताना दिसतोय. रस्त्यावर एक भारतीय जोडपं फिरत होतं, तेवढ्यात गाडीतून आलेल्या एका व्यक्तीने त्यांना विचारलं की तुम्ही भारतीय आहात का ? त्या जोडप्याने हो असं उत्तर दिलं, मात्र ते ऐकून त्या इसमाने त्या जोडप्याला अमेरिका सेोडून जाण्यास सांगितलं. ही घटना नेमकी कुठे घडली, त्या व्हिडीओतून अमेरिकेतील नेमके ठिकाण उघड झालं नसलं तरी, अमेरिकेत राहणाऱ्या इतर स्थलांतरितांचे अनुभव आणि काही लोकांच्या मनात परदेशी लोकांबद्दल असलेला द्वेष यांचं हे एक बोलकं उदाहरण आहे. परदेशी लोकांना अनेक ठिकाणी वंशभेदाचा सामना करावा लागतो हेही अनेकदा दिसून आलंय.
अमेरिकन इसमाची धमकी
या व्हिडीओत गाडीतील इसम रस्त्यावर फिरणाऱ्या त्या जोडप्याला भारताबद्दल प्रश्न विचारतो. भारत चांगला की अमेरिका?, असा सवाल ऐकल्यावर त्या जोडप्यातील पतीने सीन क्रिएट न करता, अतिशय शांतपणे उत्तर दिलं की, दोन्ही देशांत चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी आहेत. आमचं कुटुंब भारतात राहतं, असं त्याने पुढे सांगितलं. ते ऐकून समोरचा इसम म्हणाला की, भारत एवढा चांगला आहे, तर तुम्ही अमेरिकेत काय करताय ?
I encountered some incredible H-1B indians, and I had to let them know something! pic.twitter.com/Qi8FyfcjzF
— tone (@AyTone4th) May 20, 2026
आम्ही फक्त इथे फिरायला आलोय असं त्या जोडप्याने समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते ऐकूनही अमेरिक इसमाने अतिशय आक्रमकपणे उत्तर दिलं. ‘आम्हाला तुम्ही इथे (या देशात) नको आहात, तुम्ही घरी परत जा. माझ्या देशातून चालते व्हा’ अशा शब्दात त्याने जोडप्याला सुनावलं. एवढे कठोर शब्द आणि अपमानजनक वाक्य ऐकूनही, संपूर्ण संभाषणादरम्यान ते जोडपं शांत आणि संयमी राहिलं.
ही व्हिडिओ क्लिप ऑनलाइन झटपट व्हायरल झाली असून , अशी परिस्थिती शांतपणे हाताळल्याबद्दल अनेकांनीत्या जोडप्याचे कौतुक केले. सोशल मीडिया युजर्सनी जोडप्याच्या वागणुकीचं कौतुक केलं. धमकावणाऱ्या इसमाच्या वागण्याला प्रत्युत्तर दिले नाही, हे आवर्जून नमूद केलं.