
लग्नानंतर परपुरुष किंवा परस्त्री एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आली, तर संसाराची राख व्हायला वेळ लागत नाही. विवाहबाह्य संबंध चुकीचेच आहेत. पण लग्नानंतर आयुष्यात आलेल्या तो किंवा ती यांच्याबद्दल ओढ प्रचंड वाढली, तर माणसं कुठलही पाऊल उचलताना मागचा-पुढचा विचार करत नाहीत. सोबत राहण्यासाठी म्हणून टोकाची पावलं उचलल्याची अनेक उदहारणं आहेत. मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये असचं एक हैराण करणारं प्रकरण समोर आलय. एक व्यक्ती एसपी ऑफिसमध्ये आला. पत्नीपासून जीवाला धोका असल्याचं सांगत त्याने पोलीस संरक्षणाची मागणी केली. त्याने सांगितलं की, बॉयफ्रेंडलाही सोबत घरात राहू द्यावं म्हणून पत्नी हट्ट करत होती. मी याला विरोध केला म्हणून पत्नीने मला बेदम मारहाण केली व मुलांना घेऊन फरार झाली.
ग्वालियरच्या सिकंदर कंपू भागात राहणाऱ्या राजकुमार कुशवाहचं 2008 साली पूनम कुशवाहसोबत हिंदू पद्धतीने लग्न झालं. दोघांचं वैवाहिक आयुष्य आनंदात सुरु होतं. त्यांना चार मुलं झाली. सुरुवातीला सर्व काही चांगलं होतं. पण नंतर मात्र वैवाहिक आयुष्यात वादविवाद, भांडणं सुरु झाली.
घरी परतल्यानंतर तिने काय सांगितलं?
22 जानेवारी 2026 रोजी पती राजकुमारला काहीही न सांगता पूनम घरातून निघून गेली. बरीच शोधाशोध करुनही काही माहिती मिळाली नाही. मार्च 2026 मध्ये अचानक ती परत घरी आली. घरी आल्यावर विचारलं इतके दिवस कुठे होती, तेव्हा तिने आशु ऊर्फ कमल सेन नावाच्या युवकासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली. मागच्या दोन महिन्यांपासून ती त्याच्यासोबतच होती.
तिने काय अट घातली?
राजकुमारच्या म्हणण्यांनुसार पूनम घरी आल्यानंतर तिने अजब अट ठेवली. पत्नी म्हणून मी संसार करावा अशी राजकुमारची इच्छा असेल तर बॉयफ्रेंड आशु सुद्धा सोबत राहिलं अशी तिने अट घातली. राजकुमारने तिची ही अनैतिक अट धुडकावून लावली. त्यानंतर घरात तणाव वाढला. सतत भांडण व्हायची.
दुपारी परत आली
5 मे 2026 रोजी सकाळी पत्नी पुन्हा न सांगता घरातून निघून गेली. दुपारी परत आली, तेव्हा राजकुमारला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. त्यांच्यात पुन्हा भांडण सुरु होताच पूनमने जवळची वीट उचलली व राजकुमारच्या डोक्यात घातली. जखमी झाल्यानंतर राजकुमारने पोलीस स्टेशन गाठलं.