Headlines

भारतात धावणार हायड्रोजन रेल्वे, रेल्वे विभागाने दिली थेट मंजुरी; अशी असेल रेल्वे!

भारतात धावणार हायड्रोजन रेल्वे, रेल्वे विभागाने दिली थेट मंजुरी; अशी असेल रेल्वे!
भारतात धावणार हायड्रोजन रेल्वे, रेल्वे विभागाने दिली थेट मंजुरी; अशी असेल रेल्वे!


Hydrogen Railway : भारताच्या रेल्वे विभागाकडून रेल्वे सेवा नेमकी कशी सुरळीत राहील, यासाठी नेहमी वेगवेगळे प्रयोग केले जातात. रेल्वेची सेवा अत्याधुनिक, सुरक्षित असावी याकडे रेल्वे विभागाचे कटाक्षाने लक्ष असते. गेल्या काही वर्षात रेल्वे मंत्रालय तसेच रेल्वे विभागाने रेल्वेचा वेग कसा वाढेल, तसेच वेगवेगळ्या रेल्वे सामान्यांच्या सेवेत कशा दाखल करता येतील, यासाठी चांगले प्रयत्न झालेले आहेत. दरम्यान, आता भारतीयांना आणखी एक मोठी आणि चांगली खुशखबर मिळाली आहे. भारतात आता हायड्रोजन रेल्वे चालवण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावेल, हेदेखील ठरवण्यात आले आहे.

10 डब्यांची हायड्रोजन रेल्वे धावणार

आता तुम्हाला हायड्रोजन रेल्वेने लवकरच प्रवास करता येणार आहे. कारण रेल्वे बोर्डाने देशातील हायड्रोजन इंधनावर चालणारी पहिल्या ट्रेनच्या प्रवासाला मंजुरी दिली आहे. म्हणजेच आता हायड्रोजन इंधनावर चालणारी ट्रेन भारतात प्रत्यक्ष धावणार आहे. याआधी उत्तर रेल्वेने या रेल्वेचे ट्रायल रन अनेक टप्प्यांत पूर्ण केलेले आहे. आता ही ट्रेन नियमितपणे रेल्वेरुळावर धावणार आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार 22 मे 2026 रोजी रेल्वे बोर्डाने एक पत्र जारी केले आहे. रेल्वे बोर्डाने उत्तर रेल्वेला हे पत्र पाठवलेले असून त्यात हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या रेल्वेची सुरुवात करण्यास सांगण्यात आले आहे. ही ट्रेन एकूण 10 डब्यांची असेल. या रेल्वेच्या धावण्यास मंजुरी देण्यात आलेली असली तरी प्रत्यक्ष कोणत्या तारखेपासून रेल्वे रुळावरून प्रत्यक्ष धावेल, हे अद्याप स्ष्ट झालेले नाही.

कशी असेल रेल्वे?

मिळालेल्या माहितीनुसार हायड्रोजन इंधनावर धावणारी ही ट्रेन 10 डब्यांची असेल. ही रेल्वे जास्तीत जास्त 75 किमी प्रतितास या वेगाने धावेल. ही रेल्वे दिल्ली विभागाच्या जिन्द-सोनिपत या मार्गावर धावेल. याच रुटवर हाइड्रोजन सेल फ्युअल बेस्ड DPRS 1200 KW DEMU या रेल्वेची चाचणी घेण्यात आली होती. या ट्रेनमुे कार्बन डायऑक्साईडचे शून्य उत्सर्जन होणार आहे. म्हणजेच या रेल्वेमुळे हवा प्रदूषण होणार नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *