
राज्यतील राजकारणात सध्या खूप मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहेत तर कालच आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आणि आमदार सचिन अहिर यांनी थेट महायुतीकडून उपसभापती अर्ज भरला. सचिन अहिर यांची आज बिनविरोध उपसभापती पदी निवड झाली.
उबाठा गटातील सुषमा अंधारे यांनी संबंधित प्रकरणावर बोलताना नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात आमचीच लोकं महायुतीकडून अर्ज भरत आहेत. सभागृहात आमच्या लोकांकडून आवाज उठवला जात नाही, मात्र हे दुसरीकडे बंड करतात. पडद्यामागे नेमकं काहीतरी घडतंय?
या सर्व गोष्टीचं अकाऊंटीग झालंच पाहिजे. टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना सुषमा अंधारे यांनी खंत व्यक्त केली.