Headlines

सर्वात मोठी बातमी! सरकार पाडण्याचा कट उधळला, प्रत्येक आमदाराला 50 कोटींची ऑफर, राजकारणात मोठी खळबळ

सर्वात मोठी बातमी! सरकार पाडण्याचा कट उधळला, प्रत्येक आमदाराला 50 कोटींची ऑफर, राजकारणात मोठी खळबळ
सर्वात मोठी बातमी! सरकार पाडण्याचा कट उधळला, प्रत्येक आमदाराला 50 कोटींची ऑफर, राजकारणात मोठी खळबळ


तामिळनाडू विधानसभा Image Credit source: टीव्ही 9 मराठी

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. तब्बल 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असून, त्यांनी आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन आहिर यांनी देखील उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. दरम्यान या सर्व खासदारांना 50-50 कोटी रुपये दिल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून शिंदे गटावर होत असताना आता तामिळनाडूच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीने मोठी खळबळ उडाली आहे.

राज्याच्या गुप्तचर यंत्रणेनं एका मोठ्या राजकीय कटाचा पर्दाफाश केला आहे. तामिळनाडूमध्ये दोन महिन्यांपूर्वीच थलपती विजय यांच्या नेतृत्वात सरकारची स्थापना झाली आहे. हे सरकार पाडण्याचा प्लॅन तयार करण्यात आल्याचा दावा गुप्तचर यंत्रणेंकडून करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणेनं केलेल्या दाव्यानुसार या कटाचा उद्देश थलपती विजय यांच्या सरकारमधील 15 आमदारांना एकाचवेळी राजीनामा देऊन हे सरकार अल्पमतात आणण्याचा होता. सरकार अल्पमतात आल्यानंतर सरकार पाडलं जाणार होतं.

जेव्हा उथंगरई विधानसभा मतदारसंघाचे टीव्हीकेचे आमदार एन. एलैयाराजा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, मला एका कंसल्टेंसी फर्फ कडून 35 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. तसेच मी ही गोष्ट कोणाला सांगू नये यासाठी मला धमक्या देखील देण्यात येत होत्या, असं त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. एन. एलैयाराजा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच तामिळनाडूमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान या राजकीय कटाचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले हे तीनही लोक डीएमकेचे माजी मंत्री, आमदार सेंथिल बालाजी आणि त्यांचा भाऊ अशोक यांच्याशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *