
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष एका महिन्यापेक्षा अधिक काळ चालला. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध सुरू होताच सांगितले होते की, हे युद्ध फार काळ टिकणार नाही. पण उलटे झाले. इराणने ज्या पद्धतीने पलटवार केला, त्यानंतर एकच खळबळ उडाली. जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. होर्मुज खाडीत अजूनही तणाव आहे. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच अत्यंत मोठी घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत म्हटले की, इराण जवळपास सर्वच गोष्टींवर तयार आहे. इराणने आपला समृद्ध युरेनियमचा साठा सोपवण्यासही सहमती दर्शवली आहे. सहा आठवड्यांच्या संघर्षानंतर शांतता कराराच्या अत्यंत जवळ पोहोचलो आहोत. आता फक्त दोन्ही बाजूंनी एकत्र येऊन समोरासमोर बसून चर्चा करणे शिल्लक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, तेहरान अण्वस्त्रे बनवण्यासाठी वापरू शकेल अशी युरेनियम साठे ते आम्हाला परत देण्यास तयार आहेत.
ते जवळजवळ प्रत्येक गोष्टीवर सहमत झाले आहेत. आता चर्चेसाठी बसणे फक्त शिल्लक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदी कराराच्या अत्यंत जवळ पोहोचल्याचे म्हटले. हेच नाही तर जवळपास गोष्टींवर सहमती झाल्याचेही त्यांनी म्हटले. खरोखरच इराण आपले युरेनियम साठे अमेरिकेला देणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष बाब म्हणजे डोनाल्ड ट्रम्प इराणसोबतच्या युद्धबंदी करारात पहिल्यांदाच सकारात्मक दिसले.
यादरम्यानच्या संवादात त्यांनी कुठेही इराणला धमकी दिली नाही, ही विशेष बाब आहे. आता इराण आणि अमेरिका कराराच्या अत्यंत जवळ असल्याचे बघायला मिळत आहे. इस्लामाबादमध्ये इराणसोबत करार होऊन तो अंतिम झाल्यास आपण पाकिस्तानला जाऊ शकतो असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
इराण आणि अमेरिका युद्धबंदी करार कोणत्याही क्षणी होऊ शकतात. दोन्ही देशांमध्ये लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे. इराण आणि अमेरिका युद्धात कोणीही देश पडण्यास तयार नव्हता. अमेरिकेने होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता अनेक प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही. अमेरिकेने होर्मुज खाडीत मोठी नाकेबंदी केली आहे.