Headlines

डोळ्यांचे पारणे फिटतील असा सुंदर देश, तरीही देश सोडण्यासाठी सुरु आहे धावपळ…

डोळ्यांचे पारणे फिटतील असा सुंदर देश, तरीही देश सोडण्यासाठी सुरु आहे धावपळ…
डोळ्यांचे पारणे फिटतील असा सुंदर देश, तरीही देश सोडण्यासाठी सुरु आहे धावपळ…


बर्फाने झाकलेले डोंगर, निळे आकाश, स्वच्छ नद्या आणि शुद्ध ताजी हवा असे धुंद करणारे वातावरण सुंदर वातावरण असूनही न्यूझीलंडमधील लोक हा देश सोडत आहेत. महागाई, कमजोर अर्थव्यवस्था आणि कमी पगार या कारणांना एक वर्षात ७० हजाराहून अधिक नागरिकांना हा देश सोडला आहे.यातील बहुतांशी लोक चांगले जीवन, मोठे पॅकेज आणि सुविधांच्या शोधासाठी शेजारील ऑस्ट्रेलियात जात आहेत.

जगातील सुंदर देशांची नावे काढली तर त्या न्यूझीलंड नाव वरच्या क्रमांकावर येते. बर्फाच्छादीत पर्वत, ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’ चित्रपटातील जादूई हिरवळ, शांत समुद्र किनारे आणि जगातले सर्वाधिक आरामदायी जीवन..आपण जेथे सुट्टी घालवण्याची स्वप्ने पाहात असतो. पण जरा थांबा…या पृथ्वीवरील स्वर्गाला नजर लागली आहे. न्यूझीलंडमधील नागरिक धडाधड आपल्या सुटकेस पॅक करत आहेत. आणि देश सोडून जात आहेत. एकाच वर्षात ७० हजार लोकांनी या स्वर्गाला बाय-बाय केले आहे. असे काय झाले की लोक या सुंदर देशाला सोडून जात आहेत.

न्युझीलंडची एकूण लोकसंख्या सुमारे ५० ते ५१ लाख आहे. यातील जर ७१ हजार लोक सोडून जात असतील तर एकूण लोकसंख्येच्या १.४ टक्के लोक पलायन करत असतील तर प्रश्न निर्माण होत आहेत. कोरोनाच्या आधीही लोक देश सोडत होते. मात्र, तेव्हा फारतर वर्षाला ३००० लोक स्थलांतर करत होते. ती एक सामान्य बाब मानली जात होती. परंतू गेल्या १२ महिन्यात ७१,००० हजार लोकांनी न्युझीलंड सोडले आहे आणि त्यातील केवळ २६,००० परत आले आहेत. म्हणजे जाणाऱ्यांची रांगा मोठ्या आहेत. आणि येणाऱ्यांचा वेग मंद आहे.

आधी जे तरुण- तरुणी कॉलेजचे शिक्षण पूर्ण करत होते. ते मजा म्हणून एक ते दोन वर्षे परदेश फिरण्यासाठी किंवा काम करण्यासाठी बाहेर जायचे. यास येथे ओव्हरसिज एक्सपीरियन्स म्हटले जाते. परंतू आता २० ते ३० वर्षांचे अनुभवी प्रोफेशनल्स जात आहेत. जे मार्केटमध्ये चांगला अनुभव राखतात. आणि सगळ्यात मोठी बाब म्हणजे यांचा पुन्हा देशात येण्याचा कोणातही इरादा नसतो. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा परदेशी लोक जे आपला देश सोडून न्यूझीलंडला राहण्यासाठी आले होते. ते देखील आपले चंबु गबाळे आवरुन निघून जात आहेत.

कुठे जात आहेत लोक ?

हे लोक अमेरिका, लंडन वा युरोपचे स्वप्न पाहात नाहीत. तर शेजारील ऑस्ट्रेलियात जात आहेत. आकडेवारीनुसार न्यूझीलंड सोडणारे ६० टक्के लोक ऑस्ट्रेलियाला शिफ्ट होत आहेत. तस्मान समुद्र पार करुन ऑस्ट्रेलियात आज ७ लाखाहून अधिक न्यूझीलंडवासी रहात आहेत. ऑस्ट्रेलियात त्याचे नातेवाईक, मित्र, असल्याने त्यांना तेथे सेटल होण्यात कोणतीही अडचणही नाही.

न्यूझीलंडमध्ये बेरोजगारीचार दर ३.५ टक्के झाला आहे. तेथील प्रमाणानुसार गेल्या १० वर्षातील हा आकडा सर्वात जास्त आहे. सरकारी नोकरीची संख्या कमी झाली आहे. २०२५ मध्ये देशाच्या जीडीपीची ग्रोथ केवळ १ टक्क्यांच्या आसपास रेंगाळत आहे. किराणा, रेशन, आणि घराचे भाडे आकाशाला भिडले आहे आणि बॉस पगार वाढवण्याचे नाव घेत नाहीए अशी परिस्थिती न्यूझीलंडची झाली आहे. ऑस्ट्रेलियात लोकांचा ओढा वाढला आहे की कारण तेथील अर्थव्यवस्था तेजीत आहे. बेरोजगारी कमी आणि पगार न्युझीलंडच्या तुलनेत जास्त आहे.

एक्स्ट्रा बोनस आणि सुट्ट्या

ऑस्ट्रेलियात ओव्हर टाईमचे वेगळे पैसे, विकेण्डला काम केल्याचा एक्स्ट्रा बोनस आणि सुट्ट्या मिळत आहेत. ऑस्ट्रेलियात एका नर्सला वर्षभरात ६० – ६२ हजार अमेरिकन डॉलरचे म्हणजे ५० लाख रुपयांचे पॅकेज मिळत आहे. त्यामुळेच गेल्या वर्षी दहा हजार नर्सेसने न्युझीलंड सोडून ऑस्ट्रेलिया गाठले आहे. ऑस्ट्रेलियात खाणीचे उत्खनन आणि रिअल इस्टेटचा काम जोरात सुरु आहे. स्किल्ड वर्कर्सना मोठी मागणी आहे. न्युझीलंडमधील २०० हून अधिक पोलिसांनी नोकरी गेल्या अडीच वर्षात सोडून ऑस्ट्रेलियातील वर्दी चढवली आहे. ऑस्ट्रेलियात त्यांना महिन्याला ७५,००० डॉलर आणि रहायला स्वस्त घरांची लालूच दाखवण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *