Headlines

त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्… उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा

त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्… उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्… उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतले. एकाएकी अनेक नेत्यांनी माघार घेतल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

याच प्रकरणी संजय राऊतांनी TV9 मराठीशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, संभाजीनगरमध्ये आमच्या एका उमेदवाराने माघार घेतली, त्यांच्यावर दबाव आणला गेला असावा. इतर ठिकाणी उमेदवार सरळ विकत घेतले गेले आहेत. पुढे राऊत म्हणाले, “तुम्हाला सांगतो, आज सकाळपासून तब्बल 150 कोटींची उधळण झाली. चक्क संभाजीनगरमधील हॉटेल्समध्ये मोठे व्यवहार झाले. आम्ही उमेदवारी रद्द करणाऱ्यांची हाकलपट्टी केली.”

दरम्यान, 17 जागांपैकी महायुतीने 6 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. यामध्ये ठाणे, कोकण, यवतमाळ, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर, पुणे आणि अहिल्यानगर या 6 जागांचा समावेश आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *