Headlines

त्या 80 लाख लाडक्या बहिणींकडून पैशांची वसूली होणार की नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थेट भाष्य..

त्या 80 लाख लाडक्या बहिणींकडून पैशांची वसूली होणार की नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थेट भाष्य..
त्या 80 लाख लाडक्या बहिणींकडून पैशांची वसूली होणार की नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थेट भाष्य..


ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना आणली. या योजनेतून प्रत्येक महिन्याला महिलांना 1500 रूपये सरकारकडून मिळतात. मात्र, या योजनेकरिता सरकारकडून काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्या. महिलांनी या नियम आणि अटीला धाब्यावर बसून थेट अर्ज केली. त्यावेळी सरसकट अर्ज पात्र केली आणि महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. आता सरकारकडून नियमात न बसणाऱ्या महिलांना या योजनेतून अपात्र ठरवले जात आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून अर्जांची छाननी केली जात आहे. यादरम्यानच तब्बल 80 लाख महिला या योजनेतून अपात्र झाल्या. ज्याने खळबळ उडाली. यासोबतच पात्र नसताना अर्ज करणाऱ्या महिलांवर कारवाई होणार, अशी देखील जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात महिला अपात्र ठरल्याने सरकारवर देखील टीका केली जात आहे.

यादरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ज्या 80 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरल्या आहेत, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही. त्यांच्याकडून पैसे वसूल केली जाणार नाहीत. अपात्र ठरलेल्या महिलांकडून पैशांची वसूली केली जाणार असल्याची चर्चा होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली की, लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या असल्यातरीही त्यांच्याकडून वसूली केली जाणार नाही. आयकर विभागाच्या मदतीने सरकारकडून लाडकी बहीण योजनेकरिता अर्ज केलेल्या अर्जांची छाननी केली जात आहे. हे काम असून सुरूच आहे. लाडक्या बहिणींकरिता एक दिलासादायक बातमी म्हणजे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.

लाडक्या बहिणींच्या अपात्रेची संख्या अजून वाढण्याचे संकेत आहेत. सरकारकडून ज्यावेळी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली, त्यावेळी काही निकष ठरवण्यात आली. त्यामध्ये उत्पन्न, वयाची अट, जर इतर कोणत्या सरकारी योजनेचा फायदा महिला घेत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. यासोबतच चारचाकी गाडी असेल त्यांनाही या योजनेचा फायदा घेता येणार नव्हता, हे निकष ठेवण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *