
केके यांच्या नावावर अनेक सुपरहिट रोमँटिक गाणी असली, तरी एका विशेष गाण्याने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. तब्बल २७ वर्षांनंतरही हे गाणे ऐकताना अनेकांचे डोळे पाणावतात. हे गाणे म्हणजे १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील ‘तडप तडप के.’ सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे, चित्रपटात जेव्हा ते दोघे वेगळे होतात, तेव्हा त्यांच्यातील विरहाची तीव्र वेदना अत्यंत प्रभावीपणे मांडते.