Headlines

ना रेनकोट, ना छत्री, डीमार्टमध्ये ही गोष्टी घेण्यासाठी ग्राहकांची तुंबड गर्दी..

ना रेनकोट, ना छत्री, डीमार्टमध्ये ही गोष्टी घेण्यासाठी ग्राहकांची तुंबड गर्दी..
ना रेनकोट, ना छत्री, डीमार्टमध्ये ही गोष्टी घेण्यासाठी ग्राहकांची तुंबड गर्दी..


आजकाल लोक किराणा दुकानात खरेदी करण्यापेक्षा डीमार्टमध्येच जाऊन महिन्याचा किराणा आणि घरात लागणाऱ्या गोष्टी आणण्यावर भर देतात. काही वर्षापूर्वी असे होते की, महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पगार झाल्यानंतर किराणा दुकानात यादी दिली जायची आणि महिनाभर लागणारा किराणा एकदाच घरी आणला जायचा. मात्र, आता तसे राहिले नाही. लोक महिन्याभराचा किराणा आणण्यासाठी डीमार्टमध्ये पोहोचतात. डीमार्टची सर्वात विशेष गोष्टी म्हणजे एकाच छताखाली आपल्या सर्व वस्तू आरामात मिळतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, घरातील प्रत्येक वस्तू आज डीमार्टमध्ये मिळते. मग ते कोणता सण असो किंवा शाळेला सुरूवात प्रत्येक गोष्ट डीमार्टमध्ये असते. सर्वात खास बाब म्हणजे या गोष्टींवर मोठा डिस्काऊंट देखील मिळतोय. ज्यामुळे थेट पैशांची मोठी बचत होते. एमआरपीपेक्षाही स्वस्त वस्तू डीमार्टमध्ये मिळतात.

त्यामध्येच आता पावसाळा सुरू आहे. जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस अजिबात झाला नाही. पण जुलै महिन्याच्या पहिल्याच तारखेपासून पावसाला सुरूवात झाली. पावसाळ्यात उपयोगी येणाऱ्या अनेक वस्तू सध्या डीमार्टमध्ये मिळत आहेत. छत्री, रेनकोट, बॅग सर्वकाही डीमार्टमध्ये मिळत आहे. मात्र, छत्री आणि रेनकोटपेक्षाही यादरम्यान डीमार्टमध्ये एक गोष्टीची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली.

छत्री आणि रेनकोटपेक्षाही पावसाळी चप्पल खरेदी करण्यासाठी डीमार्टमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली. पावसाळी चप्पल अगदी 100 रूपयांपासून डीमार्टमध्ये मिळत आहे. मजबूत आणि टिकावू अशी पावसाळी चप्पल डीमार्टमध्ये मिळत आहे. यासोबतच अनेक डिझाईनच्या पावसाळी चप्पल सध्या डीमार्टमध्ये आहेत. ज्याची तूफान मागणी आहे.

बाहेर जर आपण पावसाळी चप्पल घेण्यासाठी गेलो तर तिथे महागात मिळत आहेत. पण डीमार्टला अगदी स्वस्तामध्ये पावसाळी चप्पल मिळत आहे. फक्त 100 रूपयांमध्ये तुम्हाला डीमार्टमध्ये पावसाळी चप्पल मिळतंय. यासोबतच पावसाळ्यात लागणाऱ्या महत्वाच्य वस्तूवर डीमार्टकडून मोठी सवलत देखील दिली जात आहे. फॅन्सी छत्री, लहान मुलांच्या छत्री मोठ्या प्रमाणात डीमार्टमध्ये बघायला मिळत आहेत. ग्राहकांनी सध्या डीमार्टमध्ये चांगलीच मोठी गर्दी केलीये.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *