Headlines

फक्त नावालाच दहशत… एका गोळीत ढगात…पाकिस्तानमध्ये अज्ञात शूटरची दहशत, 2 वर्षात 20 अतिरेक्यांचा खातमा; संपूर्ण लिस्ट पाहा

फक्त नावालाच दहशत… एका गोळीत ढगात…पाकिस्तानमध्ये अज्ञात शूटरची दहशत, 2 वर्षात 20 अतिरेक्यांचा खातमा; संपूर्ण लिस्ट पाहा
फक्त नावालाच दहशत… एका गोळीत ढगात…पाकिस्तानमध्ये अज्ञात शूटरची दहशत, 2 वर्षात 20 अतिरेक्यांचा खातमा; संपूर्ण लिस्ट पाहा


१४ फेब्रुवारी २०१९ च्या पुलवामा हल्ल्याचा एक मास्टरमाईंड असलेला हमजा बुरहान याची पाकिस्तानच्या ताब्यातील कश्मीर (पीओके) अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आहे. ही हटना मुझफ्फराबाद येथे झाली होती. तेथे त्याच्यावर अंधाधुंद गोळ्या बरसवण्यात आल्या. गोळ्यांच्या वर्षाव झाल्याने त्याच्या शरीराची अक्षरश: चाळण झाल्याने त्याचे जागीच प्राण गेले. भारताला वॉण्टेड असलेले अतिरेकी पाकिस्तानात अचानक मारले जाण्याची ही पहिलीच घटना नाही.तेथे एका पाठापाठ अशा हत्या होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अलिकडच्या एक – दोन वर्षातील अशा हत्यांचा हा एक पॅटर्न बनला आहे. अज्ञात मारेकरी खुलेआम फायरिंग करुन अतिरेक्यांचा खात्मा करत आहेत. अलिकडच्या महिन्यात २० हून अधिक अतिरेक्यांची अशा प्रकारे अज्ञात मारेकऱ्यांनी घात लावून हत्या केली आहे. यात भारताला हवे असलेल्या अनेक नामचीन अतिरेक्यांचा समावेश आहे.

भारताचे दुश्मन पाकिस्तानात गोळीबारात ठार

  1. लष्कर अतिरेकी फैझल नदीम उर्फ अबु कताल, मार्च 2025
  2. लष्कर-ए-तोयबाच्या राजकीय शाखेचा प्रमुख मौलाना काशिफ अली, फेब्रुवारी 2025
  3. ISI चा अंडरकव्हर एजंट मुफ्ती शाह मीर, मार्च 2025
  4. अतिरेकी मसूद अझहरचा जवळचा साथीदार रहीम उल्लाह तारिक,नोव्हेंबर 2023
  5. लष्करचा अतिरेकी अकरम गाझी, नोव्हेंबर 2023
  6. लष्करचा अतिरेकी ख्वाजा शाहिद, नोव्हेंबर 2023
  7. लष्करचा अतिरेकी मौलाना जियाऊर रहमान, सप्टेंबर 2023
  8. मसूद अझहरचा जवळचा साथीदार एजाज आबिद, एप्रिल 2025
  9. मसूद अझहरचा साथीदार दाऊद मालिक, ऑक्टोबर 2023
  10. लष्करचा अतिरेकी अदनान अहमद,डिसेंबर 2023
  11. हिजबुल अतिरेकी बशीर अहमद पीर, फेब्रुवारी 2023
  12. जैशचा अतिरेकी जहूर इब्राहिम, मार्च 2022
  13. आयएसपीआर अधिकारी मेजर दानियाल, मार्च 2025
  14. लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी रियाज अहमद, सप्टेंबर 2023
  15. खालिस्तानी अतिरेकी परमजीत सिंह पंजवार, मे 2023

गेल्या दोन वर्षात अशा घटनांमध्ये लागोपाठ वाढ होताना दिसत आहे. हमजा बुरहान याच्याशिवाय देखील अनेक हत्या झाल्या आहेत. अलिकडच्या वर्षात पाकिस्तानात अनेक अतिरेक्यांचा अज्ञात बंदूकधाऱ्यांनी खात्मा केला आहे. मात्र, पाकिस्तानच्या सरकारने या घटनांवर अधिकृत कोणतेही वक्तव्य केलेले नाही आणि तपासासंदर्भातही काही सुगावा लागू दिलेला नाही.

प्रमुख अतिरेक्यांना आणि नेत्यांना टार्गेट केले जात असल्याने लष्कर-ए-तोयबा आणि जैश -ए-मोहम्मद सारख्या संघटनांना पुन्हा संघटित होण्यात अडचणी येत आहेत. ऑपरेशन सिंदुरनंतर या दोन्ही अतिरेकी गटाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कारवायांना लगाम लागला आहे. अशा हत्यांमुळे त्यांच्या मनोबलावर परिणाम झाला आहे. या संघटनांशी जोडले जाणारे तरुण देखील कमी झाले आहेत.

पुलवामा प्रकरणात वॉण्टेड असलेला हमजा बुरहान याची गुरुवारी हत्या झाली, त्याला २०२२ मध्ये भारत सरकारने अतिरेकी म्हणून घोषीत केले होते. रजुमंद गुलजार डार उर्फ हमजा बुरहान उर्फ डॉक्टर ( वय २३ वर्षे ) हा खारबतपोरा, रत्नीपोरा, पुलवामाचा रहिवासी आहे. आणि अल-बद्र अतिरेकी संघटनेचा सहायक सदस्य आहे. या संघटनेस युएपीए अंतर्गत बंदी आहे.

भारतातील सर्वात भीषण अतिरेकी हल्ला

पुलवामा हल्ला हा भारतातील सर्वात भीषण अतिरेकी हल्ल्यापैकी एक मानला जातो. १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सीआरपीएफ जवानांच्या वाहनांच्या ताफ्यावर लेथपोरा क्षेत्रात एका आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली कारची टक्कर ठोकरुन मोठा ब्लास्ट घडवला. यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-महम्मंदने स्वीकारली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *