Headlines

बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर…पाच जणांवर गुन्हा दाखल

बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर…पाच जणांवर गुन्हा दाखल
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर…पाच जणांवर गुन्हा दाखल


राज्याभरात गुन्हेगारी, छळ तसेच घातपाताच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. अलीकडे पुन्हा एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. बीडमधील विवाहितेला नवऱ्यासह सासरच्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, इतकेच नाही तर याआधी तिला सासरच्यांनी मारहाणही केली.

नवरा, सासू, सासरा, दीर आणि जाऊ अशा पाच जणांनी मिळून चार लाखांसाठी विवाहितेला उपाशी ठेवलं. यानंतर आसूड आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. पीडितेच्या सासरच्या मंडळीला गॅरेजसाठी जागा खरेदी करायची होती. यासाठी ते वारंवार सुनेला मारहाण करत, त्याशिवाय तिला माहेरून पैसे घेऊन ये असं सांगत. इतक्यावरच न थांबता सासरच्यांनी पीडितेला लहान लेकरांसह घरातून हाकललं. या संबंधीत प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस दल पुढील कारवाई करत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *