Headlines

मसाल्यातील जावित्री फुलाचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

मसाल्यातील जावित्री फुलाचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे
मसाल्यातील जावित्री फुलाचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे


जेवणाची चव वाढण्यासाठी प्रत्येकजण अनेक मसाल्याचा वापर केला जातो. अशातच जाावित्री एक सुंगधी मसाला आहे जे भारतीय स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तर जाावित्री हा मसाला पदार्थांची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. तुम्ही तुमच्या गरम मसाल्यात अनेकदा जावित्री वापरले असेल. ‘मायरिस्टिका फ्रॅग्रन्स’ नावाच्या झाडाच्या फळातून बाहेर येणाऱ्या बीवर जाळीसारखे आवरण म्‍हणजे जावित्री. या फळातून बाहेर येणारी बी म्हणजे जायफळ आणि त्यावर असलेली लाल जाळी जी फूलाप्रमाणे दिसते ते म्हणजे जावित्री. किराणा दुकानात सहज उपलब्ध होणारा हा मसाला गुणधर्मांचा खजिना मानला जातो. तुम्ही जर जावित्री गरम पाण्यात टाकून ते पाणी प्यायल्यास तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात. पोषणतज्ञांच्या मते निरोगी राहण्यासाठी जावित्री फुलाचा एका लहान तुकड्यामुळे आरोग्याला असंख्य फायदे मिळू शकतात. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.

जावित्रीचे पाणी कसे बनवायचे?

सर्वप्रथम एक कप पाणी गरम करा, त्यात जावित्री फूलाचा एक तुकडा टाका आणि किमान 5 ते 7 मिनिटे तसेच राहू द्या. थोड्याच वेळात पाण्याचा रंग बदलेल. त्यानंतर जावित्री फूलाचा तुकडा काढून टाका, पाण्यात एक चमचा शुद्ध मध मिक्स करा आणि ते पाणी प्या.

जावित्रीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

पचनक्रिया सुधारेल

अशा प्रकारे जावित्रीचे पाणी प्यायल्याने अन्न लवकर पचण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारण्यासाठी हा एक उत्तम मार्ग असून, यामुळे गॅस, पोटदुखी आणि आम्लपित्तापासून त्वरित आराम मिळतो. जावित्रीमध्ये मायरिस्टिसिन, युजेनॉल आणि पाइनिन हे घटक असतात, जे पाचक एन्झाइम्सना सक्रिय करतात.

मानसिक आरोग्य ठीक राहते

पोषणतज्ञांच्या मते जावित्रीमध्ये आवश्यक नैसर्गिक तेलं असतात जी GABA रिसेप्टर्सवर कार्य करतात, त्यामुळे हे पाणी प्यायल्याने मेंदूचे आरोग्य सुधारते. तसेच यामुळे तणाव, चिडचिड आणि मानसिक थकवा यांपासून आराम मिळतो.

शरीर शुद्धीकरण आणि रोगप्रतिकारशक्ती वाढ

जावित्रीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, तर मध देखील पोषक तत्वांनी समृद्ध असतो. हे पाणी प्यायल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि वारंवार होणारे आजार टळतात. तसेच हे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.

https://www.instagram.com/reel/DVfZrQRjMbT/?utm_source=ig_embed&ig_rid=a845c197-d776-4ec3-8c5b-b6ad7b606906

हे देखील फायदे आहेत

जावित्रीपासून तयार कोमट पाणी प्यायल्याने ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो. यामुळे पेशींचे नुकसान कमी होण्यासही मदत होते आणि मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळतो. जर तुम्हाला उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा गर्भधारणा यांसारखी कोणतीही वैद्यकीय समस्या असेल, तर याचे सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *