Headlines

महिलांचे फोटो अन् केस… गुप्तधनासाठी नको ती पातळी गाठली, मध्यरात्री भयंकर कांड; अख्खा महाराष्ट्र हादरला

महिलांचे फोटो अन् केस… गुप्तधनासाठी नको ती पातळी गाठली, मध्यरात्री भयंकर कांड; अख्खा महाराष्ट्र हादरला
महिलांचे फोटो अन् केस… गुप्तधनासाठी नको ती पातळी गाठली, मध्यरात्री भयंकर कांड; अख्खा महाराष्ट्र हादरला


जग आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना महाराष्ट्रात मात्र अंधश्रद्धा वाढत असल्याचे समोर आले आहे. यवतमाळच्या वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारेगाव शिवारात गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी पूजा करत असलेल्या सहा जणांना वडगाव जंगल पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री अटक केली. शिवारात मोटार पंप चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने ठाणेदार विकास दांडे पथकासह आडवळणाच्या रस्त्याने गस्त घालत असताना वरूड-कारेगाव रस्त्यावर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गुप्तधनासाठी मध्यरात्री भयंकर कांड

समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांचे पथक वरूड ते कारेगाव मार्गावर संशयास्पद स्थितीत (एमएच 01 बीएफ 6026) क्रमांकाचे वाहन उभे दिसले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अघोरी पूजेशी संबंधित विविध साहित्य आढळून आले. यामध्ये कुदळ, अगरबत्ती, ज्वारीचे पीठ, काळ्या बाहुल्या, त्रिशूल, रुद्राक्ष माळ, लिंबू, केस, सुया, ताबीज, रंगीबेरंगी धागे आदी वस्तूंचा समावेश होता. या साहित्याच्या आधारे संशयित सहा जणांची चौकशी केली असता त्यांनी जमिनीतून गुप्तधन काढण्यासाठी शिवारात आलो असल्याची कबुली दिली.

अनेकांना अटक

यानंतर पोलिसांनी अशोक रामधन राठोड (50 रा. हरदा, ता.मानोरा, जि.वाशिम), रितेश रवी भगत (19, रा. आमगव्हाण, ता. मानोरा, जि. वाशिम), लीलेश्वर विश्वनाथ बावणे (26, रा. कारखेडा, ता. मानोरा, जि.वाशिम), कुंदन दारासिंग राठोड (28, रा. वाई गौळ, ता.मानोरा, जि.वाशिम), वीरेंद्र रमेश गायकवाड (35) केशव राठोड (50, रा. बोरगाव, ता. आर्णी) यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा 2013 अंतर्गत कलम 3 (1) (2) (3) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

महिलांचे फोटो अन् केस…

महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी काही महिलांचे फोटो आणि केस सुद्धा आढळले आहे. तसेच पंचधातूचे बिर कंगण ज्याचा उपयोग अघोरी पूजेसाठी केला जातो ते सुद्धा याठिकाणी आढळून आले. वीरेंद्र गायकवाड हा ही पूजा करणारा पुजारी असल्याचं समोर आलं आहे. आता पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *