Headlines

मुलींचे नको तसले व्हिडीओ काढायचा अन्… निदा खानला आसरा देणाऱ्या MIM नगरसेवकाचे धक्कादायक कारनामे उघड

मुलींचे नको तसले व्हिडीओ काढायचा अन्… निदा खानला आसरा देणाऱ्या MIM नगरसेवकाचे धक्कादायक कारनामे उघड
मुलींचे नको तसले व्हिडीओ काढायचा अन्… निदा खानला आसरा देणाऱ्या MIM नगरसेवकाचे धक्कादायक कारनामे उघड


नाशिकच्या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणी संशयित आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल यांना सहआरोपी करण्यात आले आहे. पटेल यांच्या विरोधात नाशिकमध्ये बीएनएसचे कलम 249 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्याला नाशिक गुन्हे शाखेकडून चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, मतीन पटेलवर आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्याने फरार आरोपी निदा खानला 42 दिवस घरात ठेवलं, इतकेच नाही तर त्याने लव्ह जिहादमध्ये अनेक मुलींना फसवं होतं असं सांगितलं जात आहे. त्याने मोबाईलमध्ये अनेक मुलींचे अश्लील व्हिडीओ काढले होते, ज्याद्वारे तो त्याच्या जाळ्यात अडकलेल्या मुलींना ब्लॅकमेल करायचा. संबंधित माहितीबाबत सखोल तपास सुरु असून नाशिक आयटी कंपतनीतील प्रकरण आणखी मोठं रूप घेणार की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *