Headlines

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना बसणार आणखी एक जबर धक्का, शिवसेना शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश? बडा नेता सोडणार साथ?

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना बसणार आणखी एक जबर धक्का, शिवसेना शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश? बडा नेता सोडणार साथ?
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना बसणार आणखी एक जबर धक्का, शिवसेना शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश? बडा नेता सोडणार साथ?


शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, शिवसेना ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदार फुटले आहेत. या सर्व बंडखोर खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व खासदारांनी मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान दुसरीकडे सचिन आहीर यांनी देखील उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे. एकीकडे हे सर्व सुरू असताना आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून आमदार आणि मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक देखील आमच्या संर्पकात असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आता शिवसेना ठाकेर गटाला आणखी मोठा धक्का बसणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाला एका पाठोपाठ धक्के बसत असताना आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील या शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी जर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का असणार आहे. मात्र त्यांनी या वृत्ताचं खंडण केलं आहे. आपण कुठेही जाणार नसल्याचं शुभांगी पाटील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या? 

आपण कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही. आपण ज्या दिवशी प्रवेश करू त्या दिवशी सर्वांना सांगून प्रवेश करू. आता कुठल्याही निवडणुका  नाहीत आणि अर्जही भरायचा नाही त्यामुळे पक्षप्रवेशेचा संबंध नाही.  शिक्षक संघटनेच्या माध्यमातून माझं राज्यभरात काम आहे. ज्या दिवशी शिक्षकांच्या समस्या समजून घेईल, त्या दिवशी सर्वांना विचारून पत्रकारांना नक्की माहिती दिली जाईल असं शुभांगी पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान  उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत किंवा आदित्य ठाकरे वेळ देत नाहीत ही कार्यकर्त्यांची भावना असून, नक्कीच याबाबत कुठेतरी पाणी मुरत आहे, असं म्हणत शुभांगी पाटील यांनी आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *