
अन्न व औषध प्रशासनाचा कारभार तुकाराम मुंडे यांनी हातात घेतल्यापासून मोठ्या धाडी टाकल्या जात आहेत. भेसळयुक्तांवर जोरदार कारवाई केली जात आहे. लोकांमध्ये एक धसका बसलाय. मुंबईमध्ये नामांकित हॉटेल आणि कॅफेंवर थेट कारवाई तुकाराम मुंडेंनी केली. गुडखा विक्रेते आणि दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना तुकाराम मुंडे यांनी पळो की सळो करून सोडले. यादरम्यान आमदार अभिजीत पाटील यांनी तुकाराम मुंडे यांना मोठा सल्ला दिला. त्यांनी थेट म्हटले की, तुकाराम मुंडे यांनी इतर ठिकाणी कारवाई आणि छापेमारी करण्यापेक्षा आपल्या विभागातील घाण साफ करावी. आता तुकाराम मुंडे यांना सल्ला देणे आमदारांना चांगलेच महागात पडले. सोशल मीडियावर त्यांना जोरदार ट्रोल केले जात आहे. तुकाराम मुंडे यांनी काय करावे, हे सांगणे अभिजीत पाटलांच्या अंगलट आले.
आमदार अभिजीत पाटलांनी तुकाराम मुंडे यांना सल्ला देताच नेटकरी त्यांच्यावर चांगलेच भडकले आहे. आमदार पाटलांच्या विरोधात कमेंटचा पाऊस पडताना दिसत आहे. तुकाराम मुंडे सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना पाटलांना वाळू तस्करी प्रकरणात अटक करुन जेलची हवा दिल्याच्या प्रसंगाचा दाखला थेट नेटकऱ्यांकडून दिला जात आहे. त्याची आठवण अभिजीत पाटील यांनी नेटकऱ्यांनी करून दिली.
अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंनी धाडी मारुन कारवाई करण्यापेक्षा अगोदर आपल्या खात्यातील भ्रष्ट अधिकारी बडतर्फ करुन विभागातील घाण काढून स्वच्छ करावा, असे आवाहन आमदार अभिजीत पाटलांनी तुकाराम मुंडेंना केले होते. दरम्यान मुंडेंना सल्ला देणाऱ्या अभिजीत पाटलांना नेटकऱ्यांकडून झापले जात असून त्याच्याविरोधात सोशल मीडियावर थेटपणे बोलले जातंय.
मुंडेंच्या विभागातील प्रशांत कुचेकर हा छत्रपती संभाजीनगरमधील अधिकारी राज्यभर गुटखा तस्करीचे रॅकेट राबवतोय. असा खळबळजनक आरोप सभागृहात केला. आमदार अभिजीत पाटलांना मुंडेंनी सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना वाळू तस्करी प्रकरणात अटक करुन जेलची हवा दिली होती. त्यावेळी काही दिवस अभिजीत पाटील यांना जेलमध्ये राहण्याची वेळ आली होती. तुकाराम मुंडेंना सल्ला देणे आमदार अभिजीत पाटील यांना भारी पडले.