
केंद्रीय मंत्र्याचा मुलगा मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्याच्यावर झालेल्या गंभीर आरोपाने एकच खळबळ उडाली. ज्याने राजकीय आणि पोलीस यंत्रणा दोन्ही प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. एका 17 वर्षीय मुलीने गंभीर आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांचा मुलगा बंदी भागीरथ याच्यावर 17 वर्षीय मुलीने लैगिंग अत्याचार आणि लग्नाच्या बहाण्याने जबरदस्ती केल्याचा आरोप करत पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, भागीरथ याने झालेले आरोप फेटाळून लावली आहेत. त्याने स्पष्ट म्हटले की, आपल्याला या प्रकरणात गुंतवण्यात आले. आपण एका नियोजित हनीट्रॅपचे बळी ठरल्याचेही त्याने म्हटले आहे.
पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर भागीरथ याने म्हटले की, मुलीचे कुटुंबिय गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकत होते. मी त्यांना लग्नासाठी नकार दिल्यानंतर त्यांनी माझ्याकडे 5 कोटी रूपयांची मागणी केली. त्यांनी मला त्यावेळीच खोट्या गुन्हात अडकवण्याची धमकी दिली होती. मात्र, घटनेने मोठी खळबळ उडाली. चक्क एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर पोलिसांकडून पॉक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, ज्याने एकच खळबळ उडाली.
17 वर्षीय मुलीने केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर धक्कादायक आरोप केली आहेत. या घटनेने तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप आला. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हैदराबादमधील पेट बशीरबाद पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आणि तिथूनच मोठे खुलासे आणि आरोप होण्यास सुरूवात झाली. आरोपी भागीरथ गेल्या सहा महिन्यांपासून मुलीच्या संपर्कात होता.
भागीरथने मैत्रीच्या नात्याने मुलीशी जवळीक साधली. त्यानंतर तिला तुझ्याशीच लग्न करणार असल्याचे मुलीला वचन दिले. यादरम्यान त्याने मुलीला लग्न करणार असल्याचे वचन देत तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले. मोईनाबाद येथील एका फार्महाऊसमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. मुलगी फक्त 17 वर्षाची असल्याने भागीरथ याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. भागीरथ याला पोलिसांकडून अजून चाैकशीसाठी बोलावण्यात आले नाही.