Headlines

मोठी खळबळ! संजय राऊतांचा cockroach janata party च्या आंदोलनाला पाठिंबा?

मोठी खळबळ! संजय राऊतांचा cockroach janata party च्या आंदोलनाला पाठिंबा?
मोठी खळबळ! संजय राऊतांचा cockroach janata party च्या आंदोलनाला पाठिंबा?


देशाच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर सोशल मीडियावर “कॉकरोच जनता पार्टी” या डिजिटल चळवळीची मोठी चर्चा सुरू झाली आहे. अल्पावधीतच या चळवळीने मोठा प्रतिसाद मिळवत विक्रम नोंदवला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही तातडीने डिजिटल पातळीवर काही कार्यवाही केल्याची माहिती समोर आली आहे.

या आंदोलनाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी 6 जून रोजी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलनाची हाक दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना मोठे आवाहन केले आहे. “कॉकरोच जनता पार्टी ही एक चळवळ आहे. काही लोक राष्ट्र वाचवण्यासाठी एकत्र येत असतील तर त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत,” असे राऊत म्हणाले. राऊतांना जेव्हा विचारलं की वैयक्तिक तुमचा पाठिंबा आसेल की नाही तेव्हा ते म्हणले. ठाकरेंशी आज बैठक आहे तेव्हा ठरवू . पुढे त्यांनी २०१४ पूर्वीच्या एका आंदोनाचा उल्लेख करत सांगितलं की, पुन्हा तसाच अण्णा हजारे यांनी दिल्लीला जाऊन जंतर मंतरवरील तरुण आंदोलनकर्त्यांना पाठिंबा द्यावा, आशिर्दवाद द्यावे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *