Headlines

मोठी बातमी! खासदारांसोबतच ठाकरेंचे आमदारही करणार बंड? आकडा आला समोर; राजकारणात खळबळ

मोठी बातमी! खासदारांसोबतच ठाकरेंचे आमदारही करणार बंड? आकडा आला समोर; राजकारणात खळबळ
मोठी बातमी! खासदारांसोबतच ठाकरेंचे आमदारही करणार बंड? आकडा आला समोर; राजकारणात खळबळ


UBT MLA MP Revolt : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील खासदार लवकरच बंड पुकारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लवकरच काही खासदार आपला वेगळा गट स्थापन करू शकतात, असा दावा केला जातोय. विशेष म्हणजे संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच खासदार हा निर्णय घेऊ शकतात, असेही सांगितले जात आहे. दरम्यान, एकीकडे खासदारांच्या बंडाची चर्चा सुरू असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील बड्या नेत्याने सर्वात मोठा दावा केला आहे. ठाकरे यांच्या खासदारांसोबत आमदारदेखील बंड करणार आहेत, असं या नेत्याने म्हटलं आहे. विशेष म्हणजे बंड करणाऱ्या आमदार आणि खासदारांचाही आकडा या नेत्याने सांगितला आहे.

नेमकी काय माहिती समोर आली आहे?

एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते तथा आमदार कृपाल तुमाने यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर एकूण 7 खासदार आपला वेगळा गट स्थापन करणार आहेत. हे सातही खासदार या निर्णयापर्यंत आले आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. सोबतच उद्धव ठाकरे यांच्या एकूण 16 आमदारांपैकी एकूण 14 आमदारदेखील पक्षातून बाहेर पडणार आहेत, असा खळबळजक दावा त्यांनी केला आहे.

ऑपरेशन टायगरअंतर्गत बऱ्याच दिवसांपासून…

ठाकरे यांच्या पक्षातील फूट येणाऱ्या सहा ते सात दिवसांत होऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे. ही शक्यता खरी ठरली तर ठाकरे यांच्या पक्षातील ही अलिकडची सर्वात मोठी दुसरी फूट असेल. आमची सात खासदारांसोबत अंतिम चर्चा झालेली आहे. ऑपरेशन टायगरअंतर्गत गेल्या बऱ्याच दिवसांपासून बैठका होत आहेत. आता चर्चा संपली आहे, असंही मोठं विधान तुमाने यांनी केलंय.

ठाकरे गटाने दावे फेटाळले

दरम्यान, ठाकरे गटाने मात्र ही संभाव्य फूट नाकारली आहे. आमच्या पक्षातील सर्व खासदार आमच्यासोबत आहेत, असं ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी सांगितलेले आहे. सोबतच आमदार आदित्य ठाकरे यांनीदेखील आम्हाला खासदार सोडून कुठेही जाणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *