Headlines

मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र नेमकी कसली चर्चा झाली?

मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र नेमकी कसली चर्चा झाली?
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र नेमकी कसली चर्चा झाली?


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या नाराजीच्या चर्चांदरम्यान एक आणखी मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या आठवडाभरापासून राष्ट्रवादी ही राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते नाराज असल्याचे वृत्त समोर आले. तर पक्षातीलच नेत्यांनी हे वृत्त धांदांत खोटे असल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगतिले. तरीही पाणी कुठे तरी मुरतंय असे एकंदरीत प्रतिक्रियेतूनही समोर येत आहे. या घडामोडी कमी की काय, काल खासदार पार्थ पवार, वर्षा निवासस्थानी दाखल झाले.

खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शनिवारी रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आले आहे. पार्थ पवार हे एकटेच भेटायला गेले अशीही माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीतील धुसफूस वाढल्यानंतर पवार आणि फडणवीस यांच्यातील या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीतील बडे नेते खरंच नाराज आहेत का? येत्या काही दिवसात काही नेते वेगळी चूल मांडणार का? कुणाला पक्षातून डावललं जात आहे याची चर्चा रंगली आहे. तर आता भाजप या सर्व परिस्थितीत कोणती भूमिका घेते याकडेही लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *