Headlines

मौका सबको मिलता हैं, अमेरिकेची 42 विमान पडल्यानंतर मेजर गौरव आर्यांनी ट्रम्पना निरुत्तर करणारा एकच प्रश्न विचारला

मौका सबको मिलता हैं, अमेरिकेची 42 विमान पडल्यानंतर मेजर गौरव आर्यांनी ट्रम्पना निरुत्तर करणारा एकच प्रश्न विचारला
मौका सबको मिलता हैं, अमेरिकेची 42 विमान पडल्यानंतर मेजर गौरव आर्यांनी ट्रम्पना निरुत्तर करणारा एकच प्रश्न विचारला


नुकतीच एक बातमी समोर आली. ही बातमी अशी होती की, इराण युद्धात अमेरिकेच्या 42 फायटर जेट्सच नुकसान झालं. स्वत:ला महाबलाढ्य समजणार्‍या अमेरिकेसाठी हा मोठा झटका आहे. अमेरिकेच्या लष्करी क्षमतेसमोर अत्यंत कमकुवत भासणाऱ्या इराणने अशी कामगिरी करणं ही खूप मोठी बाब आहे. सर्वत्र सुपरपावर बनून फिरणाऱ्या अमेरिकेची प्रतिष्ठा यामुळे धुळीस मिळाली. आजच्या घडीला अमेरिकन एअर फोर्सच्या तोडीची क्षमता दुसऱ्या कुठल्याही देशाकडे नाही. त्यांच्याकडे F-22, F-35 ही पाचव्या पिढीची स्टेल्थ फायटर विमानं आहेत. या विमानांचं वैशिष्ट्य म्हणजे शत्रुच्या प्रदेशात जाऊन खोलवर हल्ला करणं. स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे ही विमानं शत्रुच्या रडारला सापडत नाहीत. इराणने एक-दोन स्टेल्थ विमानांचही नुकसान केलं. त्यामुळे त्यांना जबरदस्तीने लँडिंग करावी लागली. इराणने अमेरिकेची जी विमान उद्धवस्त केली, त्यात टेहळणी करणारी रिपर ड्रोन्स आणि हवेत दुसऱ्या विमानांमध्ये इंधन भरणारी टँकर विमानं सुद्धा आहेत.

इराण युद्धात अमेरिकेच्या नुकसान झालेल्या विमानांचा आकडा समोर आल्यानंतर डिफेन्स एक्सपर्ट मेजर गौरव आर्य यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे एक मागणी केली आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर डोनाल्ड ट्रम्प सातत्याने काही स्टेटमेंट करत होते. त्यांची ही विधानं भारताला दुखावणारी, पाकिस्तानला सुखावणारी होती. ट्रम्प यांनी आधी दावा केला की, ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाच विमानं पडली. मग आकडा वाढवून आठ केला. मग, एकदा ते म्हणाले की, 11 महागडी फायटर विमानं पडली. पण यावेळी ट्रम्प यांनी भारत किंवा पाकिस्तान कोणाचं नाव घेतलं नाही. पाकिस्तानला वाटलं आपल्या दाव्यावर ट्रम्प शिक्कामोर्तब करतायत. म्हणून ते खुश झाले.

याचे फोटो बाहेर काढा ना

आता मेजर गौरव आर्या यांनी हाच धागा पकडून म्हटलयं की, अमेरिकेच्या 42 फायटर विमानांचं नुकसान झालना, मग ट्रम्प यांनी त्या बद्दल बोलावं. ट्रम्प सतत सोशल ट्रुथवर पोस्ट करत असतात. मग, त्यांनी याबद्दलही बोललं पाहिजे. “बरं, तुम्ही म्हणता ऑपरेशन सिंदूरवेळी भारताची विमानं पडली, तुमच्याकडे तर सॅटलाईट्सचं मोठं नेटवर्क आहे. मग, भारतीय एअरबेसेसच किती नुकसान झालं, ती विमान कुठे पडली, याचे फोटो बाहेर काढा ना. बरं, तु्म्ही हे सर्व आम्हाला नका देऊ. जगासमोर आणा. आम्हाला पण समजू दे किती नुकसान झालय ते” असं मेजर गौरव आर्य यांनी हे उपरोधिकपणे म्हटलय. खोटे, पोकळ दावे करणाऱ्या अमेरिका आणि पाकिस्तानचा त्यांनी टराटरा बुरखा फाडला.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *