Headlines

राज्य सरकारचा मोठा निर्णय; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

राज्य सरकारचा मोठा निर्णय; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
राज्य सरकारचा मोठा निर्णय; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा


श्रद्धा, संस्कृती आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला राज्य सरकारने ‘अ वर्ग पर्यटन क्षेत्र’ (A Category Tourism Area) असा दर्जा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या निर्णयाची अधिकृत घोषणा केली आहे.

या निर्णयामुळे पुण्यातील या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. तसेच भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा, पायाभूत विकास आणि पर्यटन वाढीसाठी सरकारकडून विशेष योजना राबवल्या जाणार आहेत. धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध गणपती संस्थान असून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या नवीन दर्जामुळे परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. स्थानिक नागरिक, व्यापारी आणि भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. हि सर्वांसाठीच आनंदाची बाब आहे असं स्थानिक नागरिकांकडून सांगितलं जातंय.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *