
उल्हासनगर येथे लव्ह जिहादचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आरोपीने आपले खोटे नाव सांगून एका हिंदू तरुणीशी प्रेमसंबंध ठेवत विवाह केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.लग्नानंतर आपल्याला बिहार येथे नेऊन बुरखा आणि हिजाबची सक्ती केली, गोमांस खायला सक्ती करीत छळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
पीडित महिलेने उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार,आरोपीने स्वतःचं नाव विजय वर्मा असल्याचे सांगत तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले.यानंतर दोघांचा विवाह झाला.लग्नानंतर आरोपीने तिला बिहार येथे नेले, जिथे तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.तसंच तिच्यावर बुरखा आणि हिजाब घालण्याची तसेच गोमांस खाण्याची सक्ती करण्यात आली.तसंच पतीच्या कुटुंबीयांकडून मारहाण आणि विनयभंगाचा प्रयत्न झाल्याचाही आरोप पीडित तरुणीने केला आहे.दरम्यान,या दाम्पत्याला तीन मुले असल्याची माहिती समोर आली आहे.
दुसरे लग्न केल्यानंतर घराबाहेर काढले
पीडित महिलेचा आरोप केला आहे की, पतीने दुसरे लग्न केल्यानंतर तिला घराबाहेर काढले.यानंतर ती आईकडे राहत असताना देखील आरोपींकडून तोडफोड आणि त्रास दिला जात असल्याचे पीडित तरुणीने म्हटलं आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात या महिलेने पतीसह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी इम्रान शेख, सलमान शेख आणि एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी सांगितले.