Headlines

IND vs AFG : अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित-विराटबाबत मोठा निर्णय

IND vs AFG : अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित-विराटबाबत मोठा निर्णय
IND vs AFG : अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित-विराटबाबत मोठा निर्णय


आयपीएल 2026 स्पर्धेनंतर (IPL 2026) टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध (Afghanistan Tour Of India 2026) एकमेव कसोटी सामना आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकूण 3 एकदिवसीय सामन्यांचा थरार रंगणार आहे. या कसोटी आणि वनडे सीरिजमधील एकूण 4 सामन्यांसाठी निवड समितीने मंगळवारी 19 मे रोजी टीम इंडियाची घोषणा केली आहे. निवड समितीने एकदिवसीय मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. बीसीसीआयकडून सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

शुबमन गिल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तसेच विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. या दोघांना संधी दिली जाणार नसल्याची चर्चा पाहायला मिळत होती. रोहित आणि विराटच्या जागी युवा खेळाडूंना संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र दोघांना संधी देण्यात आली आहे. मात्र रोहित खेळणार की नाही? हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे रोहित मालिकेआधी फिट होती की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हार्दिक पंड्या मालिकेला मुकणार?

रोहित प्रमाणे ऑलराउंडर हार्दिक पंड्या खेळणार की नाही? हे स्पष्ट नाही. हार्दिकची एकदिवसीय संघात निवड करण्यात आलीय. मात्र हार्दिक तोवर फिट झाला तर तो खेळू शकेल. त्यामुळे हार्दिकलाही रोहितप्रमाणे आपली फिटनेस सिद्ध करावी लागणार आहे.

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

उभयसंघातील पहिला एकदिवसीय सामना हा 14 जून रोजी खेळवण्यात येणार आहे. सलामीच्या सामन्याचं आयोजन हे धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. दुसरा सामना हा 17 जून रोजी लखनौतील अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. तर तिसऱ्या आणि अंतिम सामन्याचा थरार हा 20 जून रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये रंगणार आहे. उभयसंघातील तिन्ही सामन्यांना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध कोणत्या खेळाडूंना संधी? जाणून घ्या

अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा (फिटनेसवर अवलंबून), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (फिटनेसवर अवलंबून), नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, प्रसीध कृष्णा, गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *