Headlines

वैभव सूर्यवंशी विराट कोहलीच्या पाया पडला नाही! समोर येताच होती अशी प्रतिक्रिया Video

वैभव सूर्यवंशी विराट कोहलीच्या पाया पडला नाही! समोर येताच होती अशी प्रतिक्रिया Video
वैभव सूर्यवंशी विराट कोहलीच्या पाया पडला नाही! समोर येताच होती अशी प्रतिक्रिया Video


वैभव सूर्यवंशी विराट कोहलीच्या पाया पडला नाही! समोर येताच होती अशी प्रतिक्रिया VideoImage Credit source: X And Video Grab

Virat Kohli- Vaibhav Sooryavanshi: आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत झाली. या सामन्याचा साक्षीदार वैभव सूर्यवंशी राहिला. मैदानात उपस्थित राहून त्याने आरसीबीचा विजयी सोहळा डोळ्यादेखत पाहिला. या सामन्यात शुबमन गिल आणि साई सुदर्शन स्वस्तात बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशीला ऑरेंज कॅप मिळणार हे देखील कन्फर्म झालं होतं. आरसीबीने जेतेपदाला गवसणी घातल्यानंतर वैभव सूर्यवंशीने मैदानात जाऊन विराट कोहलीची भेट घेतली. पण या भेटीदरम्यान वैभव सूर्यवंशीचा अंदाज काही वेगळा दिसला. कायम मोठ्या क्रिकेटपटूंच्या पाया पडणाऱ्या वैभवने विराट कोहलीसोबत तसं काही केलं नाही. वैभव सूर्यवंशीने जेव्हा विराट कोहलीली पाहिलं तेव्हा लांबूनच हात जोडून नमस्कार केला. त्यानंतर विराट कोहलीची भेट घेतली. या भेटीची व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहून शकता या दोघांची भेट कशी झाली ती…

वैभव विराट भेटल्यानंतर काय झालं?

वैभव सूर्यवंशीच्या कृतीनंतर विराट कोहली पुढे गेला आणि त्याने हात मिळवला. इतकंच काय तर वैभवच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी चर्चाही केली. दोघांनी खूप साऱ्या गप्पा मारल्या. फोटो आणि व्हिडीओतून एक बाब स्पष्ट आहे की, विराट कोहलीने वैभवला आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला असावा. वैभव सूर्यवंशी आणि विराट कोहली या व्हिडीओमुळे चर्चेत आहेत. या दोघांनी या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. वैभव सूर्यवंशीने चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला. दिग्गज गोलंदाजांना त्याने दिवसा तारे दाखवले. दुसरीकडे, विराट कोहलीने अंतिम फेरीत जबरदस्त खेळी करून टीकाकारांची तोंड बंद केली आहेत.

वैभव सूर्यवंशी आणि विराट कोहलीची खेळी

वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 स्पर्धेची ऑरेंज कॅप पटकावली. त्याने 16 सामन्यात 776 धावा केल्या. यात 72 षटकार मारले. एका पर्वात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याने रचला. दुसरीकडे, विराट कोहलीने 16 सामन्यात 675 धावा केल्या. यात नाबाद 75 धावांची खेळी अंतिम फेरीत खेळली. या खेळीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *