Headlines

व्हिक्ट्री साईन, भाजप आमदारासोबत सेल्फी… काँग्रेस नगराध्यक्षांसह 60 हून अधिक नगरसेवकांकडून हाबाडा? विजय वडेट्टीवार यांना भाजपचा जोर का धक्का?

व्हिक्ट्री साईन, भाजप आमदारासोबत सेल्फी… काँग्रेस नगराध्यक्षांसह 60 हून अधिक नगरसेवकांकडून हाबाडा? विजय वडेट्टीवार यांना भाजपचा जोर का धक्का?
व्हिक्ट्री साईन, भाजप आमदारासोबत सेल्फी… काँग्रेस नगराध्यक्षांसह 60 हून अधिक नगरसेवकांकडून हाबाडा? विजय वडेट्टीवार यांना भाजपचा जोर का धक्का?


भाजप- काँग्रेस, विजय वडेट्टीवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी

BJP on Vijay Vadettiwar: चंद्रपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसमधील टशन आणि शीतयुद्ध पुन्हा उफाळून आले आहे. विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमध्ये महापालिका निवडणुकीत मोठी खेळी खेळली होती. पण अवघ्या काही महिन्यातच भाजपने त्यावेळीचा हिशोब चुकता केल्याचे मानले जात आहे. काँग्रेसच्या नगराध्यक्षास 60 हून अधिक नगरसेवक गायब झाले आहेत. ते अचानक भाजप आमदारासोबत व्हिक्ट्री साईन करताना दिसल्याने खळबळ उडाली आहे. भाजप विजय वडेट्टीवार यांनी जोर का धक्का देणार का?

नगराध्यक्षांसह नगरसेवक भाजप आमदारांसोबत

काँग्रेसचे नॅाटरिचेबल नगराध्यक्ष आणि काही नगरसेवकांचा exclusive फोटो ‘टीव्ही ९ मराठी’च्या हाती लागले आहेत.विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील काँग्रेस नगराध्यक्ष भास्कर नंनावरे भाजप आमदारासोबत असल्याचे फोटोतून समोर आले आहे. विधानपरिषद निवडणुकीत भाजपसाठी ‘व्हीक्ट्री’ ‘V’ संकेत दाखवताना काँग्रेस नगराध्यक्ष दिसत आहेत. भाजप आमदार बंटी भांगडीया यांच्या कार्यालयात काँग्रेसचे नगराध्यक्ष आणि दोन नगरसेवक असल्याचा दावा करण्यात येत आहे. नॅाटरिचेबल होण्यापूर्वी चंद्रपूर आणि गडचिरोलीत काँग्रेस नगरसेवकांनी आमदार बंटी भांगडीया यांची भेट घेतली. ⁠शिंदेवाहीचे काँग्रेस नगरसेवक मयुर सुचक, ⁠दिलीप रामटेके यासह ६० पेक्षा जास्त नगरसेवक नॅाटरीचेबल आहेत. विजय वडेट्टीवार यांनी निलंबनाची धमकी दिल्यानंतरंही काँग्रेसचे नॅाटरिचेबल नगरसेवक परत आले नाहीत.

माझ्या संपर्कात कोणी नाही – भाजप आमदार बंटी भांगडिया

मला पण न्यूज मधून माहिती झालं की काँग्रेसचे 50 ते 60 नगरसेवक नॉट रीचेबल आहेत. मी काँग्रेस नेता नाही, त्यामुळे माझ्य वर त्यांना सांभाळण्याची जवाबदारी नाही. मी त्या भागातील आमदार असल्याने नगरसेवक माझ्या संपर्कात असतात, त्यांचे काम करून घेण्यासाठी ते माझ्या संपर्कात असतात, असा दावा भाजप आमदार बंटी भांगडिया यांनी केला. पण निवडणुकीच्या अनुषंगाने माझ्याशी कोणी संपर्कात नाही
निवडणुकीत आपल्या उमेदवाराला मदत होईल असा प्रयत्न असतो. माझ्या संपर्कात कोणी नगरसेवक नाही. वडेट्टीवार बोलले त्यांच्या संपर्कात 100 भाजप नगरसेवक आहे. घोडेबाजार चा पुरावा असेल तर आरोप करणाऱ्यांनी द्यावा. सध्या उन्हाळ्याच्या सुट्टी लागल्या आहे कोणी परिवरसाहित सुट्टी साठी गेले आहे का हे त्यांनी तपासावे. कोणी काश्मीर घाटीत गेलं असेल फोन नॉट रीचेबल असेल तर त्याला मी जवाबदार कसा असेल, असा चिमटाही भांगडिया यांनी काढला.

अदृश्य शक्ती असतात ते काम करत असतात. कोणी मतदार आम्हाला मदत करतो म्हणून येईल तर आम्ही मदत घेऊ त्यांचे स्वागत करू, हे गुप्त मतदान आहे. जे फोटो वायरल होत आहे ते माझ्या कार्यालयातील आहे पण ते आताचे नाहीत. तो नगरसेवक मला कामाच्या निमित्याने मला वारंवार भेटतो, त्याच्या सोबत एक नाही अनेक फोटो आहेत. पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेले ते फोटो नाहीत, मित्र आहेत. व्हिक्ट्री साईन दाखविला तर त्यात काय झाले. मी तीन दिवस इथं नव्हतो त्यामुळे भेटीचा प्रश्न नाही. आपल्या पक्षातील नागरसेवकानं वर काय कारवाई करावी हा वडेट्टीवार यांचा प्रश्न आहे. भाजप कार्यकर्ता म्हणून मला आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी जे जे करायला लागेल ते मी करणार आहे. उमेदवार आमची चॉईस नाहीं भाजप आमची चॉईस आहे जो पक्ष उमेदवार देईल तो आम्हाला मान्य असेल, असे आमदार भांगडिया म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *