Headlines

शाहिद कपूरच्या आईने एक – दोन नाही तर, इतक्या सेलिब्रिटींसोबत थाटला संसार, कोणाला माहिती नसेल कुटुंबाचा इतिहास

शाहिद कपूरच्या आईने एक – दोन नाही तर, इतक्या सेलिब्रिटींसोबत थाटला संसार, कोणाला माहिती नसेल कुटुंबाचा इतिहास
शाहिद कपूरच्या आईने एक – दोन नाही तर, इतक्या सेलिब्रिटींसोबत थाटला संसार, कोणाला माहिती नसेल कुटुंबाचा इतिहास


अभितेता शाहीद कपूर आणि बायको मीरा राजपूत यांची लव्हस्टोरी तर सर्वाना माहिती आहे. पण अभिनेत्याच्या आई – वडिलांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहिती नसेल… शाहिद याची आई नीलिमा आझमी फक्त 16 वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांचं लग्न 21 वर्षीय अभिनेते पंकज कपूर यांच्यासोबत 1975 मध्ये झालं होतं. लग्नानंतर पंकज कपूर स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिल्ली येथून मुंबई येथे आले… जेव्हा पंकज मुंबईत आले, तेव्हा नीलिमा गर्भवती होत्या आणि याच दरम्यान शाहित कपूर याचा जन्म झाला. पण नीलिमा आणि पंकज यांचं लग्न फार काळ काही टिकलं नाही… अखेर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला…

1981 मध्ये शाहिद कपूर याचा जन्म झाला आणि 1985 मध्य नीलिमा आणि पंकज यांचा घटस्फोट झाला. नीलिमा यांना घटस्फोट दिल्यानंतर पंकज यांच्या आयुष्यात अभिनेत्री सुप्रिया पाठक यांची एन्ट्री झाली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुप्रिया पाठक यांचं देखील पहिलं लग्न मोडलेलं होते… दरम्यान, एकत्र काम करत असताना पंकज आणि सुप्रिया यांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अखेर दोघांना त्यांच्या नात्याला पती – पत्नीचं नाव देण्याचं ठरवलं आणि लग्न केलं…

अभिनेत्याचे वडील पंकज यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर नीलिमा आझमी यांच्या आयुष्यात देखील नव्या पुरुषाची एन्ट्री झाली. राजेश खट्टर यांच्यासोबत नीलिमा यांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली… दोघांना लग्न केलं आणि ईशान खट्टर याचा जन्म झाला… ईशान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तर तो सध्या बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख भक्कम करण्यासाठी प्रयत्न करत आहे… सावत्र भाऊ ईशान याच्यासोबत शाहिद याचं चांगलं नातं आहे.

अनेक वर्ष राजेश खट्टर यांच्यासोबत राहिल्यानंतर दोघांच्या नात्यात देखील मोठ्या अडचणी येण्यास सुरुवात झाली. म्हणून राजेश आणि नीलिमा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांचा घटस्फोट झाला आणि राजेश वंदना सजनी हिच्यासोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. पण कालांतराने दोघांनी देखील लग्न केलं…

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नीलिमा आणि वंदना एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. तर नीलिमा यांनी देखील तिसरं लग्न करण्याचा विचार केला. नीलिमा यांनी तिसरं लग्न रजा अली खान यांच्यासोबत केलं. शाहित कपूर सावत्र आई – वडील आणि भावंडांसोबत आता आनंदी आयुष्य जगत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *