Headlines

संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी 12 संशयित निर्दोष!

संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल,  16 वर्षांनी 12 संशयित निर्दोष!
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल,  16 वर्षांनी 12 संशयित निर्दोष!


अकोला शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) कार्यालयावर झालेल्या कथित हल्ला प्रकरणात जिल्हा न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. या प्रकरणातील काँग्रेस आमदार साजिद पठाण, माजी महापौर मदन भरगड यांच्यासह एकूण 12 जणांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.

हे प्रकरण 12 नोव्हेंबर 2010 रोजी घडल्याचा आरोप करण्यात आला होता. सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, गांधी चौक परिसरातील संघ कार्यालयावर काही जणांनी जमाव करून दगडफेक केली होती. तसेच जळते लाकडी पुतळे आणि फटाके फेकून गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला होता.

या जाळपोळ प्रकरणात एका पोलिस कर्मचाऱ्यासह RSS चे दोन कार्यकर्ते जखमी झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या प्रकरणात माजी महापौर मदन भरगड, साजिद खान पठाण, मब्बा पहलवान, प्रकाश तायडे आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र, दीर्घ सुनावणीनंतर अकोला जिल्हा न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षी उपल्ब्ध नसल्याने सर्व 12 आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *