Headlines

संतापला.. रागवला.. आणि ओरडला! तिलक वर्माने सांगितलं हार्दिक पांड्याने काय केलं ते

संतापला.. रागवला.. आणि ओरडला! तिलक वर्माने सांगितलं हार्दिक पांड्याने काय केलं ते
संतापला.. रागवला.. आणि ओरडला! तिलक वर्माने सांगितलं हार्दिक पांड्याने काय केलं ते


संतापला.. रागवला.. आणि ओरडला! तिलक वर्माने सांगितलं हार्दिक पांड्याने काय केलं तेImage Credit source: PTI

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करून विजयी सुरूवात केली. पण त्यानंतर विजयाची गाडी रूळावरून घसरली. एका पाठोपाठ एक चार पराभव सहन करावे लागले. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज झाले होते. पण गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने जोरदार पुनरामगन केलं. या सामन्यात तिलक वर्माची खेळी महत्त्वाची ठरली. त्याने 45 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. पण त्याने या आक्रमक खेळीपूर्वी खूपच संथ केली होती. त्याने 22 चेंडूत 19 धावा केल्या होत्या. पण कर्णधार हार्दिक पांड्याच्या संतापानंतर त्याने गिअर बदलला आणि आक्रमक फटकेबाजी केली. त्याने 23 चेंडूत 82 धावा ठोकला. सामन्यानंतर तिलक वर्माने हार्दिक पांड्या काय म्हणाला याबाबत सर्वकाही सांगून टाकलं.

जिओहॉटस्टारच्या गुगल सर्च एआय मोड मॅच सेंटर लाईव्हमध्ये तिलक वर्मा म्हणाला की, ‘सर्वांना माहिती आहे की हार्दिक पांड्या उत्साही आहे आणि तो माझा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणाला की तू हे करू शकतोस, तू हे करशील. पण मला एकाग्र व्हायचं असल्याने मी त्याला शांत राहण्यास सांगितलं. मी बाकी सर्व सांभाळून घेईन असं आश्वासन दिलं.’ तिलक वर्मा पुढे म्हणाला की, ‘हे संघासाठी आणि माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. गेल्या चार-पाच सामन्यांमध्ये एक गोष्ट माझ्या मनात सतत होती की, मी क्रीजवर जास्त वेळ घालवला नव्हता आणि जास्त चेंडूंचा सामना केला नव्हता. त्यामुळे, खेळपट्टीवर थोडा वेळ घालवून संघाच्या परिस्थितीशी जुळवून घेणे हे माझे ध्येय होते.’

तिलक वर्मा पुढे म्हणाला की, आम्ही खूप दूरचा विचार न करता एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे आमच्यासाठी प्रत्येक सामना जवळपास बाद फेरीसारखाच असतो. आम्ही काय करू शकतो हे आम्हाला माहीत आहे. खेळपट्टी आणि फलंदाजीच्या क्रमाबाबत तिलक वर्मा म्हणाला की, मुंबई इंडियन्स अहमदाबादला येतो तेव्हा ते सहसा आम्हाला काळ्या मातीची खेळपट्टी देतात. जी थोडी संथ असते. खेळपट्टी संथ आणि खाली झुकलेली होती, त्यामुळे आम्हाला तोल सांभाळून सरळ फटका मारण्याचा प्रयत्न करावा लागला. दरम्यान, मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते. पण संघाला माझी जिथे गरज असेल तिथे फलंदाजी करायला मी आनंदी आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *