Headlines

स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील तणावादरम्यान सर्वात मोठी बातमी, तेल घेऊन निघालेलं जहाज हायजॅक, भारतीय ताब्यात

स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील तणावादरम्यान सर्वात मोठी बातमी, तेल घेऊन निघालेलं जहाज हायजॅक, भारतीय ताब्यात
स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील तणावादरम्यान सर्वात मोठी बातमी, तेल घेऊन निघालेलं जहाज हायजॅक, भारतीय ताब्यात


अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढतच चालला आहे, एकीकडे इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला आहे, तर दुसरीकडे अमेरिकेनं देखील स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये नाकेबंदी केली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूजची सामुद्रधुनी तेल आणि एलपीजी गॅसच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. जगाला जेवढ्या प्रमाणात तेलाची आणि गॅसची गरज लागते, त्यातील सुमारे 25 टक्के वाहतूक या मार्गाने होते. तर भारताला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज असते, त्यातील सुमारे 40 टक्के तेलाची वाहतूक याच मार्गाने होते. दरम्यान अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये 28 फेब्रुवारीपासून युद्ध सुरू झालं आहे, या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने आधी स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला होता, त्यानंतर आता अमेरिकेनं देखील या मार्गावर नाकेबंदी केली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे संपूर्ण जगावरच मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. याचा सर्वाधिक फटका हा भारताला बसला आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेतून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यामध्ये तब्बल 61 टक्के घट झाली आहे.

आता एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये तणाव वाढलेला असतानाच समुद्रात पुन्हा एकदा समुद्री डाकू सक्रिय झाले आहेत. सोमालियाच्या जवळ एक तेलाचं टँकर हायजॅक करण्यात आलं आहे. याबाबत बीबीसीकडून माहिती देण्यात आली आहे. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार Honour 25 नावाचं जहाज सोमालियाच्या किनाऱ्यापासून 30 नॉटिकल मौल दूर असताना अचानक काही शस्त्राधारी लोकांनी या जहाजावर हल्ला केला. हे जहाज त्यांनी ताब्यात घेतलं आहे. हे जाहाज जेव्हा हायजॅक झालं तेव्हा या जहाजावर एकूण 17 क्रू मेंबर होते.

त्यामध्ये 1 भारतीय 4 इंडोनेशिया, 1 श्रीलंका 10 पाकिस्तानी आणि एक म्यानमारच्या क्रू मेंबरचा समावेश होता, समोर आलेल्या माहितीनुसार या जहाजामध्ये तब्बल 18,500 बॅरल एवढं कच्च तेल होतं. हे जहाज सोमालियाची राजधानी मोगादिशूकडे निघालं होतं. मात्र वाटेतच त्याला हायजॅक करण्यात आलं आहे. यापूर्वे हे जहाज होर्मूज सामुद्रधुनीच्या आसपास देखील दिसून आलं होतं. या घटनेमुळे जगाची चिंता आता आणखी वाढली आहे, एकीकडे वाहतुकीसाठी स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद आहे, तर दुसरीकडे आता समुद्रात समुद्री डाकू देखील सक्रीय झाले आहेत, त्यामुळे जगाची चिंता आणखी वाढली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *